शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ खून प्रेमाच्या त्रिकोणामधून

By admin | Updated: March 3, 2015 01:14 IST

मैत्रिणीच्या घरी अभ्यासासाठी गेलेल्या मित्राचा खून प्रेमाच्या त्रिकोणामधून झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

पुणे : मैत्रिणीच्या घरी अभ्यासासाठी गेलेल्या मित्राचा खून प्रेमाच्या त्रिकोणामधून झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मैत्रिणीसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी धायरीमधील बेनकर वस्तीमधील एका सदनिकेत हा खून झाला होता. चक्कर येऊन पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची बतावणी केली होती. परंतु हा खून असल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालामधून स्पष्ट झाले होते. पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करीत हा गुन्हा उघडकीस आणला.अंकिता मनीष माने (वय २३) हिच्यासह तिचा प्रियकर स्वप्निल संदीप जाधव (वय २२, रा. लष्कर) यांना अटक केली आहे. या दोघांनी मिळून विशाल रंगनाथ चाकोते (वय २३, रा. समृद्धी अपार्टमेंट, नारायणधाम, कात्रज) याचा खून केला होता. त्याचा भाऊ विजय (वय २७) याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्याच्या फिर्यादीवरून अंकितासह तिची आई प्रज्ञा आणि वडील मनीष (तिघे रा. बेनकर कॉर्नर, फ्लॅट क्र. १६, बेनकर वस्ती, वडगाव धायरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत काशिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘अंकिता आणि विशाल हे भारती विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होते. विशाल केमिकल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षाला, तर अंकिता ही इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेते. या दोघांची मैत्री होती. विशाल हा तिला अभ्यासामध्ये नेहमी मदत करायचा. आरोपी स्वप्निलसोबत तिचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत.शुक्रवारी विशालने भावाला आपण अभ्यासासाठी जात असल्याचे कळवले होते. जेव्हा तो तिच्या घरी पोचला तेव्हा स्वप्निल आधीच तेथे आलेला होता. त्याला पाहून विशालचे अंकिताशी भांडण झाले. त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली. तिला सोडवण्यासाठी गेलेल्या स्वप्निललाही त्याने मारहाण करायला सुरुवात केली. या दोघांनीही विशालचा ओढणीने गळा आवळून खून केला.’’ खून केल्यानंतर अंकिताने विशाल चक्कर येऊन पडल्याचे आईला कळवले. त्यानुसार प्रज्ञा यांनी विजयला कळवून रुग्णालयात बोलावून घेतले होते. उपचारांपूर्वीच मृत्यू झालेल्या विशालचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी अंकिता आणि स्वप्निलला अटक केली. अंकिता व विशाल भारती विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होते. विशाल केमिकल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षाला, तर अंकिता ही इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेते.