शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
2
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
3
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
4
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
5
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
6
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
7
PAK vs SL: पाकिस्तानात स्फोट, श्रीलंकन क्रिकेटर मायदेशी परतण्याची भीती, PCBचा मोठा निर्णय
8
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?
9
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
10
Children's Day 2025: सुकन्या समृद्धी ते म्युच्युअल फंड SIP पर्यंत; बालदिनी तुमच्या मुलांना द्या खास आर्थिक गिफ्ट, जाणून घ्या स्कीम्स
11
बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा
12
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
13
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
14
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
15
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
16
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
17
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
18
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
19
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
20
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन

लॉकडाऊनच्या काळात फुटपाथवर 'त्याने' ठेवले जगात पाऊल; 'देवदूत' बनून मदतीला आले मुस्लिम युवक धावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 17:24 IST

मोलमजुरी करणाऱ्या एका कुटुंबाला माणुसकीहीन मालकाने भाडे दिले नाही म्हणून घराबाहेर काढले.

ठळक मुद्देगोरगरीब कुटुंबियांना अन्न धान्य वाटण्यासाठी वडगाव येथील तरुण युवकांची मोहीम

वडगाव मावळ : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करावे लागले. हातावरती पोट असलेल्या कामगार वर्गाला त्याचा सगळ्यात जास्त फटका बसला. रोजची मजुरीत मिळणे बंद झाल्याने रोजचा दिवस ढकलायचा कसा हाच यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला आहे. अशाच एका कुटुंबाला माणुसकीहीन मालकाने भाडे दिले नाही म्हणून घराबाहेर काढले. गर्भवती महिलेला सोबत घेत या कुटुंबाने घराच्या निवाऱ्यासाठी फिरता फिरता एक जागा शोधली. वडगाव येथील पोटोबामहाराज मंदिराच्या शेजारी तळ्याकाठी तात्पुरता आसरा मिळाला. आडोसा मिळाला पण खायला अन्न नाही अशा अवस्थेतच त्या कुटुंबातील एका महिलेने एका बाळाला जन्म दिला. या परिस्थितीत एका मुस्लिम युवकाने त्यांना आधार देत महिनाभर पुरेल एवढे सर्व प्रकारचे धान्य भरून दिले.चार कुटूंब साधारण लहान मुलासह वीस ते पंचवीस जण काम मिळेल तिथे राहायचे.लॉकडाऊनमुळे कामे बंद झाली. घरभाडे द्यायला पैसे नसल्याने घर सोडण्याची वेळ आली. निवारा शोधता शोधता वडगाव गाठले.तळयाकाठी मोकळी जागा दिसली. फाटक्या प्लॅस्टिकच्या ताडपत्रीने घरासारखा आडोसा तयार केला. पैसे नसल्याने दोन दिवस पोटात अन्नाचा कण नव्हता. त्यात एका कुटुंबियात एका महिलेने बाळाला जन्म दिला. 

देवतारी त्याला कोण मारी.....

गोरगरीब कुटुंबियांना अन्न धान्य वाटण्यासाठी वडगाव येथील आफताब सय्यद, सतीष ढोरे, नयीम मुलानी यांनी शोध मोहिम सुरू केली.योगायोगाने हे कुटुंब भेटले.त्यांनी सर्व हकिकत सांगितली. या युवकांनी त्या लहान बाळाला दवाखान्यात नेऊन औषध घेऊन दिली.दुधासाठी पैसे तसेच काही दिवस पुरेल एवढे अन्न धान्य व इतर वस्तू दिल्या तसेच राहण्यासाठी त्यांची सोय देखील केली.

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळpregnant womanगर्भवती महिलाFamilyपरिवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMuslimमुस्लीम