सांगवीत अवैध धंद्यावर धाड
By Admin | Updated: March 29, 2017 00:20 IST2017-03-29T00:20:34+5:302017-03-29T00:20:34+5:30
येथे सोमवारी (दि. २७) अवैध धंद्यावर धाड टाकण्यात आली. यामध्ये १३ हजार ५९० रुपयांचा दारूचा साठा जप्त करण्यात

सांगवीत अवैध धंद्यावर धाड
सांगवी : येथे सोमवारी (दि. २७) अवैध धंद्यावर धाड टाकण्यात आली. यामध्ये १३ हजार ५९० रुपयांचा दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. दोघे जण फरार आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड, उपनिरीक्षक सी. बी. बेरड, पोलीस कॉन्स्टेबल शरद वारे, हिरवे व जाधव अधिक तपास करीत आहेत.
सांगवी येथे अवैध धंद्यांचा सुळसुळाट आहे. मटका, जुगार, दारू, ताडी, खुलेआम तेजीत चालू असतात. एसटी स्टँडपासून ते चांदणी चौकापर्यंत अवैध धंदेवाल्यांनी कब्जाच केला आहे. दररोज ३-४ लाखांची उलाढाल होत
असते. मटका, जुगार खेळण्यासाठी व दारू पिण्यासाठी सांगवी, शिरवली, कांबळेश्वर, शिरष्णे, सोमंथळी, सांगवी (ता. फलटण) येथून लोक दररोज लोक येत असतात. आचारसंहितेतही पोलिसांनी अवैध धंदे २ महिन्यांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु एकही दिवस अवैध धंदे बंद ठेवता आले नाहीत.
मटका, जुगार खेळणाऱ्यांवरही आम्ही कारवाई करणार आहोत. काल तिथे आम्ही आलो असता एक जण ताब्यात घेतला. दोघे जण फरार झाले आहेत. मटका, जुगार खेळणारे सापडले नाहीत. त्या सर्वांवर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. अवैध धंदे पूर्णपणे बंद करणार आहोत, अशी माहिती हवालदार शरद वारे यांनी दिली. (प्रतिनिधी)