शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

त्यांनी बंडखोरी व डावपेच आखून सरकार पाडलं अन् मुख्यमंत्री झाले; अजितदादांचा शरद पवारांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 09:43 IST

यशवंतराव चव्हाणांनी शरद पवारांना मानसपुत्र मानले असून त्यांना ही बंडखोरीची भूमिका आवडली नव्हती

सांगवी : १९७८ साली दोन्ही कॉंग्रेसचे सरकार चांगले चालले होते. यशवंतराव चव्हाणांचा विरोध आसताना देखील शरद पवारांनी बंडखोरी व डावपेच आखून सरकार पाडलं आणि शरद पवार मुख्यमंत्री झाले. अनेक दिग्गज नेते त्यांच्या मंत्रिमंडळात आले. यशवंतराव चव्हाणांनी शरद पवारांना मानसपुत्र मानले होते, त्यांना ही भूमिका आवडली नव्हती. लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यावर आरोप केले. मग मी कांय गद्दारी केली साठीच्यावर माझं वय झालं तरी मी सगळं ऐकत आलो. वय झाल्यावर तरुणांच्या हातात कारभार दिला जातो, पण तसे झाले नाही. शरद पवारांनी राजकीय खेळी केल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निशाणा साधला. यामुळे पवार कुटुंबात आरोप प्रत्यारोप चांगलेच वाढलेले दिसून येत आहेत.

सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद भावजयीमध्ये बारामती लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पवार कुटुंबियांमध्ये होत असलेल्या या लढतीसाठी शरद पवार गट व अजित पवार गटांकडून प्रचार, बैठका, सभांना आता बारामतीमध्ये वेग आला आहे. 

सांगवी ( ता.बारामती) येथे रविवार ( दि.२८) रोजी बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेत अजित पवार बोलत होते. पुढे अजित पवार म्हणाले सरकार पडल्या नंतर रामटेक बंगल्यावर  मीटिंग सुरू होती,तिथं यशवंतराव चव्हाणांचा फोन आला होता, परंतु फोन घेतला गेला नाही. १९७८  मध्ये 'पुरोगामी लोकशाही दल' म्हणजेच 'पुलोद'चं सरकार स्थापन होऊन शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. दीड वर्षांहून अधिक काळ हे सरकार चाललं.

दरम्यानच्या काळात देशातली समीकरणंही बदलली. जनता पक्षात फूट पडली. शेवटी इंदिरा गांधीनी शिफारस केल्यावर राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू झाली आणि पवारांचं पहिलं सरकार बरखास्त झालं.लोक माझे सांगाती या पुस्तकात सर्व लिहिलेले आहॆ.असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

टॅग्स :Puneपुणेbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४baramati-pcबारामतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार