दुसऱ्या पत्नीचा कुऱ्हाडीने खून करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:11 IST2021-03-01T04:11:43+5:302021-03-01T04:11:43+5:30

पुणे : दोघी सख्ख्या बहिणी सवती म्हणून एकत्र राहत होत्या. पतीला अनिताच्या चारित्र्याचा संशय होता. त्यावरून त्याने अनिताचा कुऱ्हाडीने ...

He killed his second wife with an ax and committed suicide by strangling her husband | दुसऱ्या पत्नीचा कुऱ्हाडीने खून करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

दुसऱ्या पत्नीचा कुऱ्हाडीने खून करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : दोघी सख्ख्या बहिणी सवती म्हणून एकत्र राहत होत्या. पतीला अनिताच्या चारित्र्याचा संशय होता. त्यावरून त्याने अनिताचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. त्यानंतर स्वत: घरातच लोखंडी अ‍ँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

तुकाराम गंगाराम कोरे (वय ४०) आणि अनिता तुकाराम कोरे (वय ३२, रा. सुंदरनगर, मांगडेवाडी, कात्रज) अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जगदेवी तुकाराम कोरे (वय ३८) हिने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. जगदेवी आणि अनिता या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. तुकाराम आणि अनिता यांनी ९ वर्षांपूर्वी एकमेकांना हार घालून घरातच लग्न केले होते. तेव्हापासून ते तिघे एकत्र राहण्यास होते. परंतु, मागील तीन महिन्यांपासून तुकाराम हा अनिताच्या चारित्र्याचा संशय घेऊ लागला होता. २६ फेब्रुवारी रोजी रात्री ते सर्व झोपले असताना तुकाराम याने अनितावर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला. त्यानंतर घराचे भिंतीला सपोर्टसाठी लावलेल्या लोखंडी अ‍ँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी साडेसात वाजता हा प्रकार जगदेवी हिच्या लक्षात आला. त्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक पासलकर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: He killed his second wife with an ax and committed suicide by strangling her husband