शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime | प्रेयसीला घर दिलं तरीही संसारात ढवळाढवळ सुरू, अखेर गळा दाबून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 15:43 IST

काेंढवा पाेलिसांनी पती-पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला...

पुणे : तिच्याशी त्याचा तीन वर्षांपूर्वी संबंध आला. विवाहित असतानाही तिच्या प्रेमापाेटी तिला घरही घेऊन दिले. मात्र, स्वत:च्या संसारात ती करत असलेली ढवळाढवळ थांबवण्यासाठी त्याने तिचा गळा दाबून खून केला आणि तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगत ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, शवविच्छेदनातून उघड झालेल्या प्रकारानंतर काेंढवा पाेलिसांनी पती-पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. रईस हनिफ शेख (वय ४०) आणि शबाना रईस शेख (वय ३५, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) अशी गुन्हा दाखल केलेल्या पतीपत्नीची नावे आहेत. फातीमाबी शेख (वय ३४, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक विश्वास भाबड यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोंढव्यातील शिवनेरीनगरमधील गल्ली नं. २३ मध्ये शुक्रवारी सकाळी ६.४५ ते ८.३० दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रईस शेख हा मजुरी काम करतो. त्याचे सुमारे १२ वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. सुमारे ३ वर्षांपूर्वी त्याचे फातीमाबी शेख हिच्याबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले.

त्याने आपल्या घरापासून काही अंतरावर तिला घर घेऊन दिले होते. फातीमाबीचा त्यांच्या संसारावर हस्तक्षेप वाढत होता. त्यातून त्यांच्यात वादावादी सुरू झाली. शुक्रवारी सकाळी अशीच त्यांच्यात वादावादी झाली असताना रईस याने तिला मारहाण करून तिचा गळा दाबला. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी तिला घेऊन तसेच ससून रुग्णालयात नेले. तेथे त्यांनी शेख हिने गळफास घेतल्याचे खोटेच डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थिती, साक्षीदारांकडे केलेली चौकशी यावरून त्यांना संशय आला. शेख हिचा केलेला इन्क्वेस्ट पंचनामा, डॉक्टरांनी दिलेले ॲडव्हान्स सर्टिफिकेटमध्ये नमूद केलेले कारण याची चौकशी केल्यावर दोघांनी गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी फिर्यादी होऊन दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीKondhvaकोंढवाPoliceपोलिस