चार शेळ्यांना क्रूरपणे मारले

By Admin | Updated: April 25, 2016 01:53 IST2016-04-25T01:53:06+5:302016-04-25T01:53:06+5:30

मावळ तालुक्यातील गोडुंब्रे गावात शेतकऱ्याच्या घरासमोरील गोठ्यात बांधलेल्या चार शेळ्यांचे, तसेच दोन करडांचे पाय कापले, डोळे काढले अशा पद्धतीने वेगवेगळे अवयव काढून क्रूर हत्या केली.

He killed four goats cruelly | चार शेळ्यांना क्रूरपणे मारले

चार शेळ्यांना क्रूरपणे मारले


शिरगाव : मावळ तालुक्यातील गोडुंब्रे गावात शेतकऱ्याच्या घरासमोरील गोठ्यात बांधलेल्या चार शेळ्यांचे, तसेच दोन करडांचे पाय कापले, डोळे काढले अशा पद्धतीने वेगवेगळे अवयव काढून क्रूर हत्या केली. शनिवारी पहाटेच्या सुमारास मृतावस्थेत शेळ्या तेथेच सोडून अज्ञात टोळके पसार झाले. हा प्रकार अघोरी विद्येच्या आहारी जाऊन की, सावंत कुटुंबीयांमध्ये भीती पसरविण्यासाठी केला, हे स्पष्ट न झाल्याने सावंत कुटुंबीय भयभीत झाले आहे.
गोडुंब्रे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागे संतोष सावंत यांचे घर आहे. शनिवारी पहाटेच्या तीनच्या सुमारास अज्ञात इसमांनी त्यांच्या घरासमोरील अंगणात बांधलेल्या चार शेळ्या व दोन पिलांची अत्यंत क्रूर पद्धतीने कत्तल केली. त्यांचे डोळे, पाय कापून व अन्य अवयव कापून नेले. करडांनाही त्यांनी सोडले नाही. करडांचासुद्धा त्यांनी क्रूर पद्धतीने बळी घेतला. त्यामुळे सावंंत कुटुंबीय हादरून गेले आहे. चोरीच्या उद्देशाने हा प्रकार घडला असता, तर शेळ्या घेऊन गेले असते.
शेळ्या चोरून न नेता जागेवरच त्यांची कत्तल करून अवयव घेऊन गेल्यामुळे कर्मकांडासाठी केलेला हा अघोरी प्रकार असून, त्यासाठी हे कृत्य केले असावे, अशी चर्चा परिसरात आहे. सावंत यांनी मागील आठवड्यातच काही शेळ्या खरेदी केल्या होत्या.
या घटनेमुळे गावकऱ्यांमध्येही भीतीचे आणि घबराटीचे
वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी गावातील तरुणांनी गस्त सुरू केली असून, नेमका काय प्रकार आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती माजी सरपंच गणेश सावंत
यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: He killed four goats cruelly