शहरं
Join us  
Trending Stories
1
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
2
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
3
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
4
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
5
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
6
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
7
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
8
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
9
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
10
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
11
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
12
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
13
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
14
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
15
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
16
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
17
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
18
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
19
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
20
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू

त्याने चौथ्या मजल्यावरून उडी मारली, पुढे जे घडलं ते पाहून सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 13:44 IST

जीवावर बेतणार हे माहित असूनही पोलिस आणि अग्निशमन जवानांनी केलेल्या धाडसाचं कौतुक सर्वत्र होत आहे...

- पांडुरंग मरगजे

धनकवडी (पुणे) : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा थरार आंबेगाव येथील सिंहगड कॉलेज परिसरातील नागरिकांनी अनुभवला. पोलिस आणि अग्निशमन जवानांनी आत्महत्येसाठी चौथ्या मजल्यावरून उडी मारलेल्या युवकाला अक्षरशः वरच्यावर अलगद झेलून मृत्यूलाही परत पाठवण्याचा भीम पराक्रम केला. जीवावर बेतणार हे माहित असूनही पोलिस आणि अग्निशमन जवानांनी केलेल्या धाडसाचं कौतुक सर्वत्र होत आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव विवेक पारखी, (वय २१ वर्षे, रा. मूळगाव नेपाळ) याने गुरुवारी (दि.५) सकाळी आठ वाजता अंबर ग्रीन सोसायटी, सिंहगड कॉलेज कँपस येथील एका चार मजली इमारतीच्या टेरेसवरून खाली उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब परिसरातील लोकांना कळताच त्यांनी पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांना कळवले. बचाव पथक अत्यंत त्वरेने हालचाल करत घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत असंख्य लोक खाली गोळा होऊन हल्लाकल्लोळ करू लागले. सुमारे दीड तास हा प्रकार सुरू होता.

एव्हाना आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विवेक पारखीला वरच्यावर झेलण्यासाठी बचाव पथक जाळे टाकत असतानाच विवेकने थेट टेरेसवरून खाली उडी घेतली. अगदी अखेरच्या क्षणी प्रसंगावधान राखत बचाव पथकाने त्याला वरच्यावर झेलले आणि हे दृश्य पाहणाऱ्यांच्या काळजाचं पार पाणी पाणी झालं. सुदैवाने विवेकचे प्राण वाचले.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन अंकित आंबेगाव पठार पोलिस चौकीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, बिट मार्शल आणि अग्निशामक केंद्रातील कर्मचार्यांनी अक्षरशः स्वतः चा जीव धोक्यात घालून आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा जीव वाचविल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सदर तरुणाने यापूर्वी सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस