शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

धाडसाने चोरटे पकडले, पण ३७ वर्षांनी फिर्यादच घेतली मागे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:10 IST

तब्बल ३७ वर्षांपूर्वी सोन्याची साखळी चोेरणाऱ्या चोरट्यांना महिलेने धाडसाने पकडले. मात्र,जामीन मिळाल्याने आरोपी फरार झाले

ठळक मुद्देलोकअदालतीत असाही न्याय : महिलेचे न्यायालयाचे खेटे वाचले बसमध्ये गर्दी असल्याचा फायदा घेत गळ्यातील ९०० रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरी

पुणे : तब्बल ३७ वर्षांपूर्वी सोन्याची साखळी चोेरणाऱ्या चोरट्यांना महिलेने धाडसाने पकडले. मात्र,जामीन मिळाल्याने आरोपी फरार झाले आणि फियार्दी महिलेलाच न्यायालयात खेटे घालण्याची वेळ आली. त्यामुळे लोकअदालतीत गुन्हा मागे घेण्यात आला. प्रवासादरम्यान ९०० रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरीला गेल्या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची फिर्याद तब्बल ३७ वर्षांनी मागे घेत हा दावा निकाली काढण्यात आला. शनिवारी झालेल्या लोक न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांच्या न्यायालयाने हे प्रकरण मिटवले. लक्ष्मीबाई ज्ञानोबा सरडे (घटनेच्या दिवशीचे वय ३०, रा. सरडे वस्ती, लोणीकंद) या  १७ जानेवारी १९८१ रोजी त्यांच्या आई मंजूबाई बबन राकसे व गावातील दोन महिलांसह भोसरी येथे राहणा-या त्यांच्या बहिणीकडे निघाल्या होत्या. येरवड्यात कर्नल हायस्कूलसमोर असलेल्या पीएमपीच्या स्टॉपवरून भोसरीसाठी बस पकडली. या प्रवासा दरम्यान बसमध्ये गर्दी असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ९०० रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरली. चोरी होत असताना सरडे यांना गळ््याजवळ कोणाचा तरी हात असल्याचे लक्षात आले होते. मात्र गाडीत गर्दी व हातात बॅग असल्याने त्यांना त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र बस काही किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्यांना गळ््यातील सोन्याची पोत चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी आईच्या मदतीने त्वरीत संशय असलेल्या तीन व्यक्तींना पकडले. चोरट्यांना एक महिलेने पकडले म्हणून बसमधील इतर प्रवाशी त्यावेळी अवाक झाले होते. या प्रकरणात सरडे यांनी तक्रार दिली होती.        फिर्यादीनुसार बादल सुंदर गागडे, विकास गुलचंद बागडे आणि सुरेश प्रसाद भाट (सर्व रा. सर्वे नंबर ८, येरवडा) यांना येरवडा पोलिसांनी या प्रकरणात अटक केली होती. त्यानुसार त्यांचा तपास करून त्यांच्याविरोधात दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर ते फरार झाले आहेत. अद्याप ते हाती न आल्याने हा गुन्हा प्रलंबित होता. त्यामुळे फिर्यादी यांनी तब्बल ३७ वर्षांनी हा गुन्हा लोक अदालतीमध्ये मागे घेतला. त्यामुळे हा खटला निकाली लागला. फिर्यादी यांनी न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस हवालदार राहुल शिंदे आणि रविंद्र कांबळे यांनी प्रयत्न केले. समन्समुळे मुलाने बोलणे सोडले. गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. खटल्याच्या संदर्भात एक दिवस फिर्यादी समन्स पाठविला होता. तो त्यांच्या मुलाच्या हाती लागला. न्यायालयातून समन्स आल्याचे पाहून तो फियार्दींवरच चिडला. न्यायालयाची नोटीस आली म्हणजे आपल्या आईने काहीतरी चुकीचे काम केले, अशी भावना त्याचा मनात निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने फियार्दीबरोबर बोलणेच सोडून दिले होती, अशी माहिती सरकारी वकील वामन कोळी यांनी दिली. या प्रकारामुळे आजही न्यायालयीन कामकाजाबात भिती असल्याचे पुढे येते, असल्याचे कोळी म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाtheftचोरीPoliceपोलिसCourtन्यायालय