शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पैसे  वाचविण्याच्या प्रयत्नात विमानयात्रेऐवजी झाली जेलयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 16:32 IST

एम्प्लॉयमेंट व्हिसा असतानाही पैसे वाचविण्यासाठी त्याने बनावट टुरिस्ट व्हिसा घेऊन दुबईला जाण्याचा प्रयत्न केला़...

ठळक मुद्देबनावट व्हिसावर दुबईला जाणाऱ्यास अटक 

पुणे : एम्प्लॉयमेंट व्हिसा असतानाही पैसे वाचविण्यासाठी त्याने बनावट टुरिस्ट व्हिसा घेऊन दुबईला जाण्याचा प्रयत्न केला़. परंतु, तपासणी  करताना विमानतळावरील अधिकाऱ्यांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही़. त्यामुळे विमानयात्रा करण्याऐवजी त्याला जेलयात्रा करण्याची पाळी आली आहे़. शेख महंमद युसुफ (वय ४६, रा़. एनआयबीएम, येवलेवाडी) असे त्याचे नाव आहे़. याप्रकरणी लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमिग्रेशन अधिकारी हेमांशु शुक्ला यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत विमानतळ पोलिसांनी सांगितले की, शेख महंमद युसुफ यांना कामासाठी दुबईला जायचे होते़. त्यासाठी त्यांच्याकडे एम्प्लॉयमेंट व्हिसाही होता़. दुबईला जाण्यासाठी व तेथे एम्प्लॉयमेंट व्हिसावर गेल्यावर पीओईला जादा पैसे लागतात़. त्याऐवजी टुरिस्ट व्हिसावर गेल्यास कमी पैसे लागतात़, याची माहिती मिळाल्याने त्यांनी दुसरा टुरिस्टचा बनावट व्हिसा तयार करुन घेतला़. त्या बनावट व्हिसावरुन ते शनिवारी एअर इंडियाच्या विमानाने दुबईला जाणार होते़. त्यासाठी ते शनिवारी दुपारी लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमिग्रेशनला गेले़. त्यांची कागदपत्रे तपासत असताना तेथील अधिकाऱ्यांना त्यांच्याकडील माहिती शेख यांच्याकडे एम्प्लॉयमेंट व्हिसा असल्याची नोंद दिसत होती़. पण, ते प्रत्यक्षात टुरिस्ट व्हिसा दाखवत होते़. त्यामुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांना संशय आला़ त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी आपल्याकडे एम्प्लॉयमेंट व्हिसा असल्याची कबुली दिल़ी़. त्यानंतर त्यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद देऊन शेख यांना पोलिसांच्या ताब्यात दिले़. व्हिसा असताना काही पैसे वाचविण्याच्या प्रयत्न त्यांनी बनावट टुरिस्ट व्हिसा काढला़. एकाच क्रमांकाचे दोन व्हिसा आढळल्याने नोकरीसाठी विमानयात्रा करणाऱ्यांना आता जेलयात्रा करावी लागली आहे. 

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसairplaneविमानtourismपर्यटन