शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पैजेसाठी कायपण..! अवघ्या नऊ मिनिटांत '' त्याने '' संपवला तब्बल ४५ कप चहा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 15:28 IST

१ हजार रुपयांची पैज जिंकण्यासाठी एका युवकाने चक्क किटलीतील ४५ कप चहा पिऊन टाकला.

बारामती  : पैज शब्दातच आव्हान आहे. अनेकजण हा पैजेचा विडा उचलण्यासाठी जीवावर उदार होतात,बेभान होतात. इंदापुर तालुक्यातील भिगवण येथील मित्रांमध्ये लागलेली पैज सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. यामध्ये मित्रांनी लावलेली १ हजार रुपयांची पैज जिंकण्यासाठी एका युवकाने चक्क किटलीतील ४५ कप चहा ९ मिनिटात पिऊन टाकला. किटलीभर चहा पितानाचा या युवकाच्या व्हिडीओने सध्या सोशल मिडीयावर धुमाकुळ घातला आहे.  सचिन सोपान शिंदे (वय ३४) असे या युवकाचे नाव आहे.सचिन हा भिगवण स्टेशन (ता. इंदापुर) येथील राहीवाशी आहे.त्याची स्वताची प्रवाशी वाहुतक करणारी रीक्षा आहे.भिगवण खडकि मार्गावर तो प्रवाशी वाहतुक  करतो. शनिवारी(दि १४) दुपारी ३ च्या दरम्यान रीक्षा थांब्यावर सर्व मित्रांमध्ये गप्पा रंगल्या.यावेळी गप्पा मारताना किटलीभर चहा संपविण्याची पैज लागली.रवि कोळेकर यांच्यासह युवराज खटके,दिनेश अनभुले,किरण कांबळे आदी मित्रांनी हि पैज लावली. यावेळी किटलीभर चहा पिऊन संपविण्याचा आत्मविश्वास असणाऱ्या सचिनने हा पैजेचा विडा उचलला. केवळ पैजेचा विडा उचलुन न थांबता सर्वांनी येथील प्रसिध्द चहाचा स्टॉल गाठला. किटलीभर असणारा ४५ कप चहा पराथीमध्ये ओतला.याच पराथीतुन सचिनने घोटाघोटाने नऊ मिनिटात संपुर्ण चहा घशाखाली उतरविला. संपुर्ण चहा प्यायल्यानंतर सुरवातीला सचिनला मळमळ होण्याचा थोडा त्रास जाणवला.मात्र, पैज जिंकल्याच्या आनंदापुढे हा त्रास त्याला जाणवला नसल्याचे तो सांगतो. पैज किती रुपयांची याचे मला महत्व नाहि.मात्र, मित्रांमध्ये एक वेगळे अनामिक नाते असते.त्याच नात्यातुन मित्र गमतीजमती करतात.त्यामुळे जीवनातील ताण नाहिसा होतो.मित्र महत्वाचेच असतात.त्यांनी लावलेली पैज जिंकण्याचा विश्वास मी सार्थ ठरविला,याचे मला समाधान असल्याचे सचिन शिंदे याने ' लोकमत ' शी बोलताना सांगितले.पैज पूर्ण केल्यानंतर मित्रांनी पैजेच्या पैशासह चहाचे बिल लगेच ' पेड' केले.मात्र, ही पैज परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

टॅग्स :BhigwanभिगवणSocial Mediaसोशल मीडियाIndapurइंदापूर