शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
7
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
8
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
9
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
10
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
11
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
12
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
13
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
14
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
15
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
16
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
17
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
18
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
19
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
20
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 

‘त्यांनी’ सनद पडताळणीसाठी अर्जच केला नाही... मागणार सर्वोच्च न्यायालयात दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 12:41 IST

मुदत संपल्यानंतर राज्यातील ५० हजारांहून अधिक वकिलांनी सनद पडताळणीसाठी अर्जच भरले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडे दावा दाखल करण्याचा ठराव बार कौन्सिलने केला आहे.

ठळक मुद्देसनद पडताळणी न केलेल्या वकिलांची सनद येणार धोक्यात सनद पडताळणीसाठी मुदतवाढ दिली गेल्यास उर्वरित वकिलांना सनद पडताळणीसाठी अर्ज भरणे शक्य

पुणे : वकिलांची सनद पडताळणीची मुदत संपल्यानंतर राज्यातील ५० हजारांहून अधिक वकिलांनी सनद पडताळणीसाठी अर्जच भरले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या वकिलांना यापुढे वकिलीच करता येणार नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढीची मागणी करणारा दावा दाखल करण्याचा ठराव बार कौन्सिलने केला आहे.बोगस वकिलांना आळा बसावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बार कौन्सिल आॅफ इंडियाला वकिलांची सनद पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रत्येक राज्यातील बार कौन्सिलकडून वकिलांची सनद पडताळणी करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू होते. सर्वोच्च न्यायालयाने सनद पडताळणीसाठी अंतिम मुदत दिल्यानंतर शेवटच्या टप्प्यात काही वकिलांनी सनद पडताळणीसाठी अर्ज भरले. मात्र, काही वकील ही प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत. बहुतांश वकिलांनी सनद पडताळणीचे अर्ज भरण्यासाठी प्रतिसादच दिला नाही. सनद पडताळणी न केलेल्या वकिलांची सनद धोक्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना काम करता येणार नाही. परिणामी, बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवासाठी होणार्‍या निवडणुकीच्या मतदानालाही ते अपात्र ठरतील. बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाचे अ‍ॅडहॉक कमिटीचे सदस्य अ‍ॅड. हर्षद निंबाळकर म्हणाले, की कमिटीकडून नुकताच एक ठराव करण्यात आला आहे. त्यानुसार ज्या वकिलांना सनद पडताळणी करता आलेली नाही त्यांना मुदत वाढ द्यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात येणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यानंतर ही याचिका दाखल करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाकडून सनद पडताळणीसाठी पुन्हा मुदतवाढ दिली गेल्यास उर्वरित वकिलांना सनद पडताळणीसाठी अर्ज भरणे शक्य होईल. सनद पडताळणीमुळे महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांतील बारकौन्सिलच्या निवडणुकादेखील लांबणीवर पडल्या असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. 

बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाकडे एक लाख ६० हजार वकिलांची नोंदणी होती. त्यांतील ८० हजार वकिलांचे सनद पडताळणीसाठी अर्ज आले होते. त्यांतील ३० हजार वकील हयात नाहीत, असे गृहीत धरले तर उरलेल्या ५० हजारांहून अधिक वकिलांनी सनद पडताळणीसाठी अर्जच दाखल केलेले नाहीत, असा त्याचा अर्थ होत असल्याचे विधिज्ञांचे मत आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPuneपुणे