शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगार वडिलांच्या खुनासाठी तो झाला गुन्हेगार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 13:53 IST

वडील मालमत्तेत आपल्या आईला तिच्या वाट्याचा हिस्सा देत नाही म्हणून त्यांचा काटा काढण्यासाठी त्याला पिस्तुल खरेदी करायचे होते़.

ठळक मुद्देचोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले असून ५५ हजार रुपयांचा ऐवज हस्तगतमिलिंद जुनवणे याचे वडील रमेश जुनवणे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार

पुणे : वडील सराईत गुन्हेगार असले तरी तो सर्वसामान्यांप्रमाणे एका कंपनीत काम करुन आपल्या आईसमवेत स्वतंत्र पण चांगले जीवन जगत होता़. पण कधी कधी विनाशकालीन विपरीत बुध्दी माणसाला रसातळाला न्यायला कारणीभूत ठरते. तसेच काहीसे त्याच्या बाबतीत घडले. आणि तो या घडीला पोलीस कोठडीची हवा खात आहे.    पोलिसांच्या तपासात पुढे आलेले सत्य असे की, वडील मालमत्तेत आपल्या आईला तिच्या वाट्याचा हिस्सा देत नाही म्हणून त्यांचा काटा काढण्यासाठी त्याला पिस्तुल खरेदी करायचे होते़. त्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी त्याने गुन्हेगारीचा काटेरी मार्ग निवडत तीन ठिकाणी घरफोड्या देखील केल्या़. पण याच गुन्ह्यात तो त्याच्या साथीदारासह थेट गुन्हेगार म्हणून कोंढवापोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याला ताब्यात घेतल्यावर चोकशीत ही बाब उघड झाली. मिलिंद रमेश जुनवणे (वय २३, रा. उत्तमनगर, पुणे) व बाळासाहेब रामचंद्र जाधव (वय ४२, रा. शिवणे, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून कोंढवा, सिंहगड रोड येथील चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले असून ५५ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद जुनवणे याचे वडील रमेश जुनवणे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे़ . त्याने शहरात पूर्वी असंख्य घरफोड्या केल्या होत्या़. त्याने दुसरे लग्न केले असून ते वेगळे राहतात़. वडील जरी गुन्हेगार असले तरी मिलिंद हा शिवणे येथील एका कंपनीत काम करुन चांगले जीवन जगत होता़. आईच्या समवेत उत्तमनगरला राहत आहे़ आपल्या आईला मालमत्तेत वाटा देत नसल्यामुळे जुनवणे हा गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ होता़. त्यातूनच त्याने वडिलांचा काटा काढण्याचे ठरविले़. त्यासाठी त्याला पिस्तुल खरेदी करायचे होते़ पिस्तुल घेण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी त्याने साथीदाराच्या मदतीने कोंढवा, सिंहगड रोडवर तीन ठिकाणी घरफोड्या केल्या़. या गुन्ह्यांचा तपास करताना कोंढवा पोलिसांनी त्यांना पकडले़. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने ही बाब कबुल केली़.ही कामगिरी उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उप आयुक्त प्रसाद अक्कानवार, वानवडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड, संतोष शिंदे व त्यांच्या पथकाने केली आहे़.

टॅग्स :Crimeगुन्हाKondhvaकोंढवाPuneपुणेPoliceपोलिसArrestअटक