शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
3
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
4
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
5
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
6
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
7
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
8
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
9
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
10
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
11
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
12
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
13
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
14
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
15
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
16
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
17
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
18
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
19
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
20
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?

मी गोळीबार करायला लावल्याचे पसरवून त्यांनी निवडणुका लढवल्या : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 13:55 IST

राजकारण करणार असेल तर विषय येथेच थांबवा : अजित पवार

पुणे : पवना बंद पाईपलाईन प्रकरणात सुरूवातीपासून राजकारण केले गेले. अजित पवारांनी गोळीबार करायला लावला असे पसरवून याच मुद्द्यावर निवडणुका लढवल्या. परंतु आता राजकारण न आणता काही करायचे असेल तरच पुढे जाईल असे स्पष्ट सांगत पवार यांनी सर्व पक्षीय आमदारांना पाईप लाईनच्या कामाची स्थगिती उठवण्यासंदर्भात लेखी मागणी देण्यास सांगितले. 

विभागीय आयुक्त कार्यालयात पवना बंद पाईप लाईन व लोकांच्या पुनर्वसन विषया संदर्भात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके व इतर पक्षाचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पवना बंद पाईप लाईनच्या कामाची स्थगिती उठवण्यासाठी सर्व संबंधित आमदारांनी लेखी मागणी करा. यासाठी पवार यांनी बैठकीत स्वत : फोन करून आमदार आण्णा बनसोडे , लक्ष्मण जगताप आणि विलास लांडगे यांना पत्र देण्यास सांगितले. तसेच यामुळे बाधित होणाऱ्या लोकांना प्रत्येकी किमान दोन एकर जमीन देणे, धरणाच्या मजबुतीकरण व उंची वाढविण्याचे काम हाती घेणे, उंची वाढल्यानंतर साठणारे अतिरिक्त पाणी साठा एक टीएमसी पिंपरी-चिंचवड महापालिकेला व अर्धा टीएमसी पाणी संबंधित गावांना देण्यासंदर्भात देखील बैठकीत चर्चा करण्यात आली. 

पवार यांनी गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सुचना दिल्या. तसेच यामध्ये गावांच्या पाणी योजनेसाठी येणारा पन्नास टक्के खर्च राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्याची तयारी देखील पवार यांनी दाखवली. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ------

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणElectionनिवडणूक