लॉकडाऊनमध्ये झालेल्या कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी तो बनला साखळी चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:16 IST2020-12-05T04:16:50+5:302020-12-05T04:16:50+5:30

लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प होते. त्यामुळे सर्वजण आर्थिक संकटात सापडले. त्यात गरीबांचे हाल झाले आहेत. त्यामुळे काही जणांनी चोरीचा ...

He became a chain thief in order to pay off his debts | लॉकडाऊनमध्ये झालेल्या कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी तो बनला साखळी चोर

लॉकडाऊनमध्ये झालेल्या कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी तो बनला साखळी चोर

लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प होते. त्यामुळे सर्वजण आर्थिक संकटात सापडले. त्यात गरीबांचे हाल झाले आहेत. त्यामुळे काही जणांनी चोरीचा मार्ग अवलंबिल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे.

संजय नथू भगत ( वय 34 रा.शारदा रेसिडन्सी, अंजनी पार्क उत्तमनगर शिवणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साखळी चोरीच्या गुन्हयाबाबत माहिती काढत असताना पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे यांना गुन्हे दाखल असणा-या या व्यक्तीकडे एक काळ्या रंगांची दुचाकी असून, त्याने साई चौक पाषाण जवळ एका महिलेचे सोन्याचे गंठन हिसकावून नेले आहे अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांची टीम तयार करून वाहनाचा नाव आणि पत्ता प्राप्त करून त्याचा शोध घेऊन अटक करण्यात आली.

पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे, मोहन जाधव, महेश भोसले, अमंलदार प्रकाश आव्हाड, वसीम सिददीकी, सारस साळवी, ज्ञानेश्वर मुळे, प्रमोद शिंदे, तेजस चोपडे, मुकुंद तारू, दिनेश गडांकुश, शैलेश सुर्वे, आशिष निमसे यांनी तपास केला. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे करीत आहेत.

---------------------------------------

Web Title: He became a chain thief in order to pay off his debts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.