शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा कहर! एकाच कुटुंबातील सदस्यांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 11:34 IST

कुटुंबात दोन, पाच दिवसांच्या अंतरावर झाले मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

ठळक मुद्देएप्रिल महिन्यापासून शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात संसर्गाचा वाढता वेग

रांजणगाव सांडस: राज्यात सुरु असलेले कोरोनाचे संकट ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसांत एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना कोरोनाने हिरावून नेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कोरोनामुळे शिरसगाव काटा येथे पाच दिवसाच्या अंतराने बाप लेकाचा मृत्यू झाला आहे.

शिरसगाव काटा येथे प्रदीप श्रीरंग जाधव यास कोरोनाची लागण झाली होती. प्रकृती खालावल्याने त्याला शिरूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. यानंतर त्याचे वडील श्रीरंग जाधव यांना ही मुलाच्या मृत्युचा जबर धक्का बसल्याने पाच दिवसांच्या अंतराने  त्यांचे राहत्या घरी निधन झाले. 

दुसऱ्या घटनेत शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील पोपट ज्ञानदेव जगताप यांचा कोरोनाने मृत्यू झाला होता.  मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी आई वच्‍छलाबाई ज्ञानदेव जगताप यांचाही दुर्दैवी मुत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. पोपट जगताप शेतीच्या कामासाठी धावपळ करत असताना कोरोनाची लागण झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. चार दिवस त्यांच्यावरती उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला .पोपट जगताप यांच्यावरती घरातील सर्व कौटुंबिक जबाबदारी होती. पण घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या आईसुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकल्या होत्या. मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्का त्या सहन करू शकल्या नाहीत. त्यांचा अंत्यविधी होण्याअगोदरच आईने आपला प्राण सोडला.  

शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात वाढलेले रुग्ण तसेच अचानक तरुण व घरातील कर्त्या पुरुषांचे निधन होणे. त्यामुळे  ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात कोरोना आजाराचा मोठा संसर्ग झाला आहे. एप्रिल महिना ते आतापर्यंत या भागात अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल