शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"एकदा काय ते होऊनच जाऊ दे...", राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेचा टिझर पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 12:12 IST

पुण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टिझर मनसेकडून प्रदर्शित करण्यात आला आहे.

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची २१ ते २८ मे दरम्यान पुण्यात सभा होणार असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली होती. परंतु ठिकाण मात्र ठरत नव्हते. सुरुवातीला सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे सभेची जागा निश्चित करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. त्यानंतर मुळा - मुठा नदीपात्रात २१ मेला जागा फिक्स करण्यात आली. पण तिथेही पावसाचे कारण देऊन पदाधिकाऱ्यांनी पुन्हा सभा रद्द झाल्याचे सांगितले. अखेर आज मनसेने रविवारी पुण्यात सभा होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. शहरात गणेश कला क्रीडा मंच येथे रविवार २२ मे रोजी सकाळी १० वाजता सभा होणार असल्याची माहिती मनसेने दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टिझर मनसेकडून प्रदर्शित करण्यात आला आहे.  

टिझरमध्ये राज ठाकरेंच्या सुरुवातीला औरंगाबादच्या सभेतील एकदा काय ते होऊनच जाऊ दे... हे वाक्य घेण्यात आले आहे. तर टिझरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणंही वाजत आहे. या टीझरवरून पुण्यातील सभा जोरदार होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्या अनुषंगाने मनसेचे पुण्यातील सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. 

अयोध्या दौऱ्याबाबत पुण्यातील सभेत सविस्तर बोलणार     

अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु प्रकृती अस्वस्थामुळे राज ठाकरेंचा दौरा काही काळासाठी स्थगित केला गेल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. पायाच्या दुखण्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे डॉक्टरांचा सल्ल्यानुसार त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर हँडलवर अयोध्या दौरा स्थगित केल्याची माहिती दिली आहे. यात त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केला असून रविवारी पुण्यात होणाऱ्या सभेत याबाबत सविस्तर बोलू असं म्हटलं आहे.  

राज ठाकरे कोणत्या विषयावर बोलणार 

औरंगाबाद, ठाणे या सभेत राज ठाकरेंनी हिंदुत्व, भोंगे अशा विषयांवर भाष्य केले. तर शरद पवारांबरोबरच महाविकास आघाडीवर टीका केली. आता पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे कोणत्या विषयावर बोलतील. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  .

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारण