शहरं
Join us  
Trending Stories
1
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
3
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
4
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
5
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
6
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
7
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
8
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
9
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
10
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
11
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
12
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
13
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
14
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
15
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
16
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
17
JEE Mains 2025: राज्यातील तीन विद्यार्थ्यांचा ‘जेईई मेन’मध्ये पैकीच्या पैकी स्कोअर
18
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
19
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
20
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका

पांढरा कावळा कधी पाहिलाय का? पुण्यात झाले दर्शन; का येतो पांढरा रंग?

By श्रीकिशन काळे | Updated: January 31, 2024 11:10 IST

कावळा म्हटलं की काळा हे समीकरण माहिती आहे....

पुणे : आपल्याला कावळा म्हटलं की काळा हे समीकरण माहिती आहे. पण कधी पांढरा कावळा पाहिला आहे का ? तर हो पांढरा कावळा देखील आहे. त्याचे नुकतेच दर्शन पर्वती परिसरात झाले आहे. ही प्रजाती दुर्मिळच आहे. या प्रकाराला ल्युसिस्टिक (leucistic) अल्बिनिझम असे म्हटले जाते. माणसांना होणारा कोड आपल्याला माहित आहे. पण प्राणी, पक्ष्यांमध्येही हा कोड दिसून येत असतो.  पर्वत परिसरात राहणारे निसर्ग अभ्यासक लोकेश बापट यांच्या हिरव्या गॅलरीत हा कावळा आला होता. त्यांनी याची नोंद केली आहे. त्यांनी त्याचे फोटो देखील काढले आहेत. त्यांनी यापुर्वी पांढरी सांळुकी पाहिली होती. त्यामुळे त्यांना हा पांढरा कावळा ओळखता आला.

याबाबत पक्षीतज्ज्ञांना विचारले तर ते म्हणाले, पक्ष्यांमधील हा एक त्वचाविकार आहे. शरीरामध्ये मेलॅनिन द्रव्य निर्माण होत असतात, त्यासाठी एंजाइम लागतात. पण त्या एंजाइमच्या कमतरतेमुळे त्वचा पांढरी व्हायला सुरुवात होते. खरंतर हा एक त्वचारोगाचा प्रकार आहे. माणसांमध्ये देखील असे पहायला मिळते. आपण त्याला कोड म्हणतो. तसेच प्राणी, पक्ष्यांमध्येही हा कोड असतो. त्याला शास्रीय अल्बिनो असे म्हटले जाते. यामध्ये सर्वच पक्ष्यांचा समावेश होत असतो.  पक्षी, प्राण्यात असा रंग येतो...

आपल्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयामध्ये देखील पांढरा वाघ आहे. खरंतर पांढरे पक्षी, प्राणी ही वेगळी प्रजाती नसते, तर त्यांच्या शरीरात काही द्रव्यांची कमतरता निर्माण झाली की असा रंग येतो. सापामध्ये देखील असे पहायला मिळते. गतवर्षी सर्पमित्र डॉ. आशिष मेरूकर यांना सापाचे एक पिल्लू आढळले होते. 

का येतो पांढरा रंग?

शरीरातील रंगद्रव्य कमी झाले असले की मग पांढरा रंग होतो. गेल्या वर्षी शंकरशेट रोडवर देखील पांढरी सांळुकी पहायला मिळाली होती. याला पार्शियल अल्बिनिझम असे म्हणतात. साळुंकीच्या डोक्याकडील भागात रंगद्रव्य कमी झाल्याने ती अर्धी पांढरी दिसत होती. हे पक्षी दिसायला वेगळे दिसतात. या पक्ष्यांना कधी कधी डोळ्यांना कमी दिसत असते. मग अशा पक्ष्यांची  इतर पक्षी शिकार करतात. ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ . सतीश पांडे यांनी तर काळा घुबड देखील पाहिला आहे. लाल रंगाची कोकिळ पाहिली आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड