शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दौंडमध्ये बोगस शिक्षण संस्थांना आळा घालणाऱ्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 19:53 IST

अधिकारी किसन भुजबळ यांच्याकडून ११० दिवसात पदभार काढून घेण्यात आल्याने पालक वर्गात संतापाची लाट पसरली

दौंड : दौंड तालुक्यातील बोगस शिक्षण संस्थांना आळा घालणारे पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी किसन भुजबळ यांच्याकडून ११० दिवसात पदभार काढून घेण्यात आल्याने पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हलक्या कानाचे कसे झाले असा ही प्रश्न तालुक्यात चर्चिला जात आहे.

काही शिक्षक पुढार्‍यांच्या वरदहस्ताने आणि राजकीय शिक्षण संस्था चालकांच्या हट्टापायी एक कार्यक्षम आणि प्रामाणिक कामकाज करणारे गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ हे राजकारणाचे बळी पडले असल्याची वस्तूस्थिती आहे. ७ एप्रिल २०२२ रोजी किसन भुजबळ यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. अवघ्या ११० दिवसात २६ जुलै २०२२ला त्यांच्या कडील अतिरिक्त पदभार ११० दिवसात काढून घेण्यात आला.  त्यांच्या कारकिर्दीत किसन भुजबळ यांनी बोगस शिक्षण संस्थांना लगाम लावून पाच शिक्षण संस्थांना टाळे ठोकले. तर तीन शिक्षण संस्थांकडून १४ लाख रुपयांचा दंड आकारण्यासंदर्भात संबंधित शिक्षण संस्थांना नोटीसा पाठवल्या होत्या. तसेच कामकाजात चुकारपणा करणाऱ्या काही शिक्षकांना सूचना देखील दिल्या होत्या.  परिणामी अचानक कुठल्याही शाळेला भेटी देणाऱ्या किसन भुजबळ यांचा एक अंकुश दौंड तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेवर बसला होता. यात मात्र कोंडी झाली होती. राजकीय संधान बांधून असलेल्या काही शिक्षक पुढाऱ्यांना तसेच तसेच राजकीय संस्थाचालकांना त्यामुळे किसन भुजबळ यांच्या तक्रारी वाढल्या. आणि एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला राजकारणाचा बळी लागल्याने पालक आणि विद्यार्थी वर्गात तसेच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांत नाराजीचा सूर आहे. दरम्यान गठशिक्षणाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीमुळे पालक जन आंदोलन करणार असल्याची वस्तुस्थिती आहे. 

टॅग्स :daund-acदौंडEducationशिक्षणTeacherशिक्षकStudentविद्यार्थीEmployeeकर्मचारी