शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Hasan Mushrif | हसन मुश्रीफांचे व्यावसायिक भागीदार चंद्रकांत गायकवाड यांच्या घरावर ED चे छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 15:07 IST

26 अधिकाऱ्यांचे पथक असून कागदपत्रांची छाननी सुरू...

पुणे :  माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी आज पहाटे पुन्हा ईडीने छापा टाकला. सुमारे 26 अधिकाऱ्यांचे पथक असून कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. लोकांची घराबाहेर गर्दी असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे. तर, दुसरीकडे मुश्रीफांचे व्यावसायिक भागिदार चंद्रकांत गायकवाड यांच्या पुण्यातील घरावर आणि ऑफिसवरही ईडीने छापेमारी केली आहे.

माजी नगराध्यक्ष व मुश्रीफ यांचे उजवे हात समजले जाणारे प्रकाश गाडेकर यांच्या घरीही छापा पडला आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या घरी यापूर्वीही आयकर आणि ईडीचे छापे पडले आहेत.त्यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत.

गडहिंग्लज शहर बंदचा निर्णय हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीने छापा टाकला. त्रास देण्याच्या उद्देशाने वारंवार घडत असलेला हा निंदनीय प्रकार आहे, याचा निषेध करण्यासाठी गडहिंग्लज बंद करण्याचा आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. घरामध्ये एके 47 रायफली तैनात केलेले पोलिस लावून अशा पद्धतीची दहशत माजवून एका चांगले काम करणाऱ्या नेत्याला असा मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने घातलेले हे ईडीचे छापे आहे,  त्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी गडहिंग्लजच्या व्यापाऱ्यांना उद्योजकांना सर्वांनी आजच्या दिवशी गडहिंग्लज कडकडीत बंद पाळण्यात यावा, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे. दुसरीकडे मुरगूडमधील व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेHasan Mushrifहसन मुश्रीफEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय