कोरोनाचे संकट टळण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांचे गणरायाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:11 IST2021-09-11T04:11:10+5:302021-09-11T04:11:10+5:30
इंदापूर येथील भाग्यश्री या निवासस्थानी पाटील कुटुंबीयांनी आज भक्तिमय वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष करीत मांगल्याची देवता ...

कोरोनाचे संकट टळण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांचे गणरायाला साकडे
इंदापूर येथील भाग्यश्री या निवासस्थानी पाटील कुटुंबीयांनी आज भक्तिमय वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष करीत मांगल्याची देवता गणरायाचे स्वागत तसेच प्रतिष्ठापना केली. संपूर्ण देश आज गणेशाच्या स्वागतासाठी उत्साही आहे. घरोघरी आज गणरायाची प्रतिष्ठापना केली जात आहे. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी दरवर्षी मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत करून प्रतिष्ठापना केली जाते. गणरायाच्या प्राणप्रतिष्ठा वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पत्नी भाग्यश्री पाटील, कन्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, मुलगा नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील उपस्थित होते.
इंदापूर येथील भाग्यश्री निवासस्थानी माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील व कुटुंबीयांनी गणरायाचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले.
१० बारामती हर्षवर्धन