शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

हर्षवर्धन पाटलांचे खंदे समर्थक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; पाटील गटाला मोठा राजकीय धक्का बसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 10:35 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे तीन एप्रिल रोजी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत

सुधाकर बोराटे 

इंदापुर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे तीन एप्रिल रोजी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्याच उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले व माजी जिल्हा परिषद सदस्या राणी आढाव यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना हर्षवर्धन पाटील समर्थकांचे पक्षांतर चर्चेचा विषय ठरला आहे.

याशिवाय अनेक बडे नेते राष्ट्रवादीच्या गळाला लागणार असल्याच्या चर्चा भाजप गटात मोठी अस्वस्थता पसरवणारी ठरली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का असल्याचे बोलले जात आहे. ढोले हे गेल्या अनेक वर्षांपासून पाटील यांचे अत्यंत विश्वासु म्हणुन ओळखले जातात. बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद  गटातुन ते जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आले होते. लाखेवाडी ग्रामपंचायतीवर त्यांची सत्ता आहे. मागील काही दिवसापासून ते नाराज असल्याची चर्चा होती. या नाराजीतून  ढोले यांनी पक्षबदलाचा निर्णय घेतल्याचे मानले जाते.

तसेच, माजी जिल्हा परिषद सदस्या राणी आढाव या भिगवण-शेटफळगढे जिल्हा परिषद गटात २०१२ मध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या पॅनलमधुन काँग्रेसच्या तिकीटावर निवडुन आल्या होत्या. त्यांचे पती माजी सरपंच आण्णा आढाव हे हर्षवर्धन पाटील यांचे विश्वासु मानले जातात. परंतु पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर पक्षात सन्मानाची वागणुक मिळत नसल्याची खंत आढाव यांनी नुकतीच व्यक्त केली आहे. याच कारणामुळे  दोघेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे.

 याशिवाय राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाच्या वेटींगलिस्ट अनेकजण असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. मात्र, संबंधितांची नावे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बंद लिफाफ्यामध्येच ठेवली आहेत. भाजप ला धक्का देत राष्ट्रवादीने झेडपी,पंचायत समीती व नगरपरिषदेवर एकहाती सत्ता काबीज करण्याची रणनीती आखण्यास सुरवात केल्याचे संकेत आहेत.

टॅग्स :harshvardhan patilहर्षवर्धन पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार