शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने इंदापूरात खळबळ; तिसऱ्या आघाडीची तयारी, लक्ष पवारांच्या निर्णयाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 15:50 IST

आप्पासाहेब जगदाळे व प्रवीण माने हे दोघे ही निवडणुक लढवण्याच्या मुद्द्यावर ठाम, पण निवडणूक रिंगणात कोण उतरणार हेच ठरेना!

पुणे: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर होताच इंदापूर मध्ये तिसरी आघाडी निर्माण होऊन निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांचा पक्ष प्रवेश झाला त्याच ठिकाणी जनता मेळावा घेतला. गर्दीही जमवली पण त्यात ठोस भूमिकाच घेतली नाही. किंवा त्यानंतरही काहीच दिशाच ठरवली गेली नाही. त्यामुळे तिसऱ्या आघाडीतील नेते शरद पवार यांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याची चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे. 

आप्पासाहेब जगदाळे गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. परंतू एकदा आ.भरणे यांनी तर दोन वेळा हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना भावनिक करुन, जगदाळे यांना उमेदवारीपासून वंचित ठेवले आहे. आपल्या सरळ स्वभावाचा फायदा त्यांनी घेतल्याचे जगदाळे यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. यंदा त्यांना निवडणूक लढवायची आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची दोन शतके झाली. शरद पवार व खा.सुप्रिया सुळे हे दोघे एकाकी पडल्यानंतर जगदाळे यांनी विनाअट शरद पवार यांना पाठींबा दिला. खा.सुप्रिया सुळे यांचा  हिरीरीने प्रचार ही केला. यंदाच्या निवडणुकीत त्याचा निश्चितपणे फायदा होईल असे त्यांना वाटले होते. मात्र इच्छुकांची गर्दी वाढली अन् त्यामध्ये भर म्हणून शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना आपल्याकडे ओढले. त्यामुळे जगदाळे यांच्या आकांक्षेवर पुन्हा एकदा पाणी पडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

  या परिस्थितीत इच्छुकांच्या रेट्याने हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी रद्द करण्याची रणनिती आप्पासाहेब जगदाळे यांनी आखली. त्यांना प्रवीण माने यांची साथ मिळाली. प्रवीण माने यांना ही यंदा विधानसभा निवडणूक लढवायची आहे. जगदाळे यांना व माने यांना मलाच उमेदवारी हवी आहे, असे थेट म्हणता येईना, अशी गोची होवून बसली आहे. शरद पवार यांनी या दोघांना ही आपली ताकद वाढवा. पक्ष संघटन अधिक मजबूत करा. भविष्यात तुम्हाला चांगली संधी नक्कीच मिळेल असे सांगितल्याची खात्रीशीर माहिती आहे. मात्र या दोघांना आ. दत्तात्रय भरणे ही नकोत अन् हर्षवर्धन पाटील त्याहून नको आहेत.    प्रवीण माने यांनी लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी सुमारे ऐंशी गावात खा. सुप्रिया सुळे यांचा एकहाती प्रचार केला आणि प्रचाराला रीतसर प्रारंभ होण्याच्या एक दिवस आधी खा.सुनेत्रा पवार यांना पाठींबा दिला. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर परत ते शरद पवारांकडे आहे. ही जी धरसोडीची भूमिका घेतली ती शरद पवारांना आवडली नाही. हे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या टीकेवरुन स्पष्ट झाले होते. त्यांना उमेदवारी न देण्यामागे हीच बाब कारणीभूत असावी असा जाणकारांना वाटते आहे.    या तीन चार दिवसात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी आप्पासाहेब जगदाळे व प्रवीण माने यांची बैठक झाली. त्यानंतर पुण्यात शरद पवारांनी ही त्यांना बोलावून घेतले होते, असे सांगितले जात नाही. या दोघांनी ही त्यास दुजोरा दिला नाही. या पार्श्‍वभूमीवर जगदाळे व माने हे दोघे ही निवडणुक लढवण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे ही बोलले जात आहे. पण निवडणूक रिंगणात कोण उतरणार हेच ठरेना. त्यापेक्षही हे दोघेही शरद पवार यांच्या निर्णयाची वाट पाहत असल्याची चर्चाही सुरू आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत तिसरी आघाडी अस्तित्वात आहे की नाही  असा प्रश्नही  इंदापूरकरांमधून विचारला जाऊ लागला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४indapur-acइंदापूरvidhan sabhaविधानसभाharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस