शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोनामुळे यंदा घरोघरीच होणार 'हरित वारी' चा गजर! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 07:20 IST

गेल्या अकरा वर्षांपासून महाराष्ट्र सरकारसोबत ज्ञानेश्वरमहाराज वाबळे आणि त्यांचे वारकरी पर्यावरण दिंडी काढत आहेत.

ठळक मुद्देपर्यावरण दिंडीकडून वृक्षलागवड, निसर्गपाठाचे वाचन

श्रीकिशन काळेपुणे : कोरोनामुळे यंदा पालखी सोहळ्यातील पर्यावरण वारी घरीच रोपं लावून साजरी करण्यात येत आहे. दरवर्षी पर्यावरण दिंडीमध्ये शेकडो वारकरी सहभागी होऊन वृक्षलागवड करीत असतात. पण आता वारी नसल्याने या दिंडीतील वारकरी घरी आणि आजुबाजूच्या परिसरात रोपं लावून त्याची जोपासना करणार आहेत. 'हरित वारी, आपआपल्या घरी' याप्रमाणे ही वारी सुरू झाली आहे.

गेल्या अकरा वर्षांपासून महाराष्ट्र सरकारसोबत ज्ञानेश्वर महाराज वाबळे आणि त्यांचे वारकरी पर्यावरण दिंडी काढत आहेत. त्या दिंडीमधून ठिकठिकाणी वृक्षलागवड करणे, वारकऱ्यांमध्ये, ग्रामस्थांमध्ये निसर्ग संवर्धनाबाबत प्रबोधन करण्याचे काम केले जाते. या वषीर्ची पर्यावरण वारी जरा अनोखी आहे. वारकऱ्यांसोबतच नागरिक देखील यात सहभागी झाले आहेत.  वृक्षलागवड ही राष्ट्रभक्ती समजून कार्य करणारे कवी चंद्रकांत शहासने यांनी हरिपाठासारखे निसर्गपाठाची रचना केली आहे. रोप लावल्यानंतर त्यासमोर हा निसर्ग पाठ वाचू शकता. 'चला लावू झाडे, वाढवूया वने, टाळू सर्व चाळे, दुष्काळाचे.. ' अशाप्रकारे या निसर्गपाठाची सुरवात आहे. व्हिडिओच्या माध्यमातून हा निसर्गपाठ वारकºयांपर्यंत पोचविण्यात येत आहे. हा उपक्रम वनअधिकारी रंगनाथ नाईकडे, श्रीपाद कोंडे, गायत्री कोंडे राबवत आहेत. याविषयी श्रीपाद कोंडे म्हणाले, यंदाची वारी हरित व्हावी, म्हणून प्रयत्न करायला हवा. वड, पिंपळ, कडूनिंब अशी देशी झाडं लावून निसर्ग संवर्धन करावे. हीच घरी यंदाची वारी असणार आहे.

घरीच फुलेल हरित वारीया हरित वारीसाठी घरी रोपं लावून ते वाढवावे, जपावे हा एक चांगला संदेश जात आहे. वृक्षलागवड केली जाते. पण नंतर लक्ष दिले जात नाही. पण या वारीत आषाढीपर्यंत रोपं चांगले वाढेल. नंतर इतरत्र कुठेही ते लावता येईल. तसेच घरातील कचरा हा कंपोस्ट खत म्हणून रोपाला घालता येईल. त्यातून रोपाची चांगली वाढ होईल. पायी वारी नसली, तरी ही हरित वारी करून विठ्ठलाला घरातून नमन करूया, अशा भावना पालखी सोहळ्यात सहभागी होणाºया अनुष्का कजबजे यांनी व्यक्त केल्या. त्यांनी देखील बाल्कनीत रोप लावले आहे.

यंदा गुळवेल वनस्पतीचे प्रबोधनयंदा पायी वारी नसली तरी घरोघरीच पर्यावरणाची वारी घडविणार आहोत. वारकरी आपल्या घरी, आजुबाजुला रोपं लावत आहेत. त्यातून ही पर्यावरणाची वारी फुलत राहील. गेली ४० वर्षांपासून आम्ही वारी करतोय. अकरा वर्षांपासून महाराष्ट्र सरकारसोबत पर्यावरण दिंडी सुरू केली. आजपर्यंत १५ हजार रोपं लावली आहेत. यंदा गुळवेल मोठ्या प्रमाणात लावावे यासाठी प्रयत्न करत आहोत. कारण ही एक औषधी वनस्पती आहे. मधुमेह, थंडी, ताप अशा आजारांवर गुणकारी आहे. आमचे वारकरी ज्ञानेश्वर सांगळे आणि अजून बरेच आहेत, ते खूप रोपं लावण्यासाठी काम करतात. प्रत्येकाने झाड लावावे, त्याची जोपासना करावी आणि यंदाची ही वारी घरीच बसून साजरी करावी.- ज्ञानेश्वर महाराज वाबळे, पर्यावरण दिंडी  

टॅग्स :PuneपुणेPandharpur Wariपंढरपूर वारीenvironmentपर्यावरणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस