ओतूर (जुन्नर): महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी भेट दिलेल्या हरिचंद्रगड येथे रविवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका भाविकाचा मृत्यू झाला. गडावरून खाली उतरताना कड्यावरून निसटलेल्या दगडाचा जबर आघात झाल्याने ही घटना घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.मृत भाविकाचे नाव सुरेश किसन दामसे (वय ३५, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे आहे. ते दर्शन आटोपून जुन्नर दरवाज्याकडील पायवाटेने खाली उतरत होते. यावेळी कड्यावरचा सैल दगड अचानक निसटून त्यांच्या डोक्यावर आणि पाठीवर कोसळला. गंभीर दुखापत झाल्याने ते घटनास्थळीच बेशुद्ध पडले.
Web Summary : A devotee died at Harishchandragad after being struck by a falling rock while descending on Mahashivratri. Suresh Damse, 35, from Ghodegaon, Pune, was fatally injured. The incident raises safety concerns amid large crowds, prompting calls for immediate preventative measures by authorities.
Web Summary : महाशिवरात्रि पर हरिश्चंद्रगढ़ में उतरते समय एक चट्टान गिरने से एक भक्त की मौत हो गई। पुणे के घोड़ेगांव के सुरेश दामसे, 35, गंभीर रूप से घायल हो गए। इस घटना ने भारी भीड़ के बीच सुरक्षा चिंताओं को बढ़ा दिया है, जिससे अधिकारियों द्वारा तत्काल निवारक उपायों की मांग की जा रही है।