अकोले येथील हरिनाम सप्ताह रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:18 IST2021-03-04T04:18:30+5:302021-03-04T04:18:30+5:30

अकोले : अकोले येथे येत्या शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह कोरोनामुळे रद्द करण्यात आलेला आहे, अशी ...

Harinam week in Akole canceled | अकोले येथील हरिनाम सप्ताह रद्द

अकोले येथील हरिनाम सप्ताह रद्द

अकोले : अकोले येथे येत्या शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह कोरोनामुळे रद्द करण्यात आलेला आहे, अशी माहिती ग्रामप्रशासन आणि सप्ताहाचे आयोजक यांनी दिली आहे.

अकोले आणि परिसरातील लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंकलेश्वर महादेवाचा गेल्या तेवीस वर्षांपासून दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी सात दिवस कीर्तन सोहळ्याचे ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात येते. अकोल्यात अंकलेश्वर महादेवाचे भव्य मंदिर असून या मंदिरात सोहळ्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. मात्र प्रशासनाकडून सर्व धार्मिक कार्यक्रम व उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे अखंड हरिनाम सप्ताह रद्द करण्याचा निर्णय अकोले ग्रामप्रशासन व सोहळ्याचे अयोजक यांनी एकमताने घेतला आहे.

फोटो ओळ--अकोले येथील अंकलेश्वर महादेवाचे मंदिर

Web Title: Harinam week in Akole canceled