शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोरमध्ये घातक शस्त्रे बाळगणारा अट्टल गुन्हेगार अखेर स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 15:23 IST

गुन्हेगारावर जिवे ठार मारण्याची धमकी देणे, जबरदस्तीने खंडणी गोळा करणे, सार्वजनीक मालमत्तेचे तसेच नागरीकांचे वाहनांची तोडफोड करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल

ठळक मुद्देगुन्हेगारी कृत्यामुळे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण

लोणी काळभोर : आपल्या साथीदारांसह लाकडी, दांडके, दगड विटा, सुरा, कु-हाड, कोयता, लोखंडी पाईप या सारखे घातक शस्त्रे जवळ बाळगून नागरिकात दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला करण्यात आले आहे. या सराईत गुन्हेगारावर जिवे ठार मारण्याची धमकी देणे, जबरदस्तीने खंडणी गोळा करणे, सार्वजनीक मालमत्तेचे तसेच नागरीकांचे वाहनांची तोडफोड करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

ऋषिकेश सुरेश पवार ( वय २३ वर्षे, रा. कदमवाकवस्ती ) स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्या हालचालींवर नजर ठेऊन त्यांच्या विरुध्द कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हेगारांचा शोध घेतला असता रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ऋषिकेश पवार हा राहत असलेल्या परिसरामध्ये स्वतः तसेच त्याचे साथीदारांसह घातक शस्त्रे जवळ बाळगुन सामान्य नागरिकांवर दहशत करुन त्यांना मारहाण करुन, जिवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांचेकडुन जबरदस्तीने खंडणी गोळा करणे, सार्वजनिक मालमत्तेचे तसेच नागरीकांचे वाहनांची तोडफोड करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ६ गुन्हे दाखल आहेत.

त्यांचे गुन्हेगारी कृत्यामुळे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या पासुन जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरीक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. मोकाशी यांनी पवार यास स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव तयार करुन सादर केला होता. गुप्ता यांनी सदर प्रस्तावाची पडताळणी करुन एम. पी. डी. ए. कायदयांतर्गत एक वर्षाकरीता स्थानबध्दतेचा आदेश पारीत केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकLoni Kalbhorलोणी काळभोर