अल्पवयीन मुलीकडे चिठ्ठी फेकणा-या तरुणाला सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:11 IST2021-04-02T04:11:50+5:302021-04-02T04:11:50+5:30

पुणे : अश्लील हावभाव करून शायरी लिहिलेली व प्रेम व्यक्त करणारा संदेश असलेली चिठ्ठी अल्पवयीन मुलीच्या दिशेने फेकणा-या ...

Hard work for a young man who throws a letter to a minor girl | अल्पवयीन मुलीकडे चिठ्ठी फेकणा-या तरुणाला सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीकडे चिठ्ठी फेकणा-या तरुणाला सक्तमजुरी

पुणे : अश्लील हावभाव करून शायरी लिहिलेली व प्रेम व्यक्त करणारा संदेश असलेली चिठ्ठी अल्पवयीन मुलीच्या दिशेने फेकणा-या तरुणाला विशेष जिल्हा न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी ३ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

अरुणकुमार भगत (वय २२, रा. तळेगाव दाभाडे) असे शिक्षा झालेल्यांचे नाव आहे. ही घटना मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे २५ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली होती.

ही अल्पवयीन मुलगी घराकडे जात होती. त्यावेळी आरोपीने तिच्याकडे बघून अश्लील वक्तव्य केले. त्यानंतर त्याने तिच्या दिशेने आय लव्ह यू तसेच हिंदी शायरी व त्याखाली मोबाइल नंबर असलेली चिठ्ठी फेकली.

तळेगाव पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून दोषारोप पत्र दाखल केले होते.

या खटल्यात सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी ५ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडीत मुलीची साक्ष व त्याला पृष्टी देणारी आरोपीने फेकलेली चिठ्ठी हा पुरावा महत्वाचा ठरला. न्यायालयाने पुरावा ग्राह्य धरून आरोपीला ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार नितीन पवार यांनी साहाय्य केले.

Web Title: Hard work for a young man who throws a letter to a minor girl