लैंगिक अत्याचाराबद्दल सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:30 IST2020-12-04T04:30:02+5:302020-12-04T04:30:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असल्याचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या तरुणास न्यायालयाने तीन वर्ष ...

लैंगिक अत्याचाराबद्दल सक्तमजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असल्याचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या तरुणास न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी हा निकाल दिला.
महेश ज्ञानोबा खराबे (वय, २५) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी १३ वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. २० एप्रिल २०१५ रोजी हा प्रकार घडला होता. खटल्याचे कामकाज सरकार पक्षातर्फे सरकारी वकील सुनील मोरे यांनी पाहिले. त्यांनी एकूण पाच साक्षीदार तपासले. घटनेच्या दिवशी फिर्यादी या बाजार आणण्यासाठी तर त्यांचा मुलगा खेळण्यासाठी बाहेर गेला होता. त्यामुळे संबंधित मुलगी ही एकटीच घरी होती. त्याचा फायदा घेत खराबे फिर्यादींच्या घरात घुसला. त्याने मुलीला मारले. ʻओरडली तर तुला मारून टाकीन'''''''', अशी धमकी दिली व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, अशी फिर्याद देण्यात आली होती.