शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

हर हर महादेव! महाशिवरात्रीला लाखो भाविकांनी गजबजणाऱ्या भीमाशंकरला यंदा कोरोनामुळे शुकशुकाट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 13:54 IST

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते पूजा 

ठळक मुद्देदरवर्षी रात्री बारापासूनच असते उत्साहाचे वातावरण 

भिमाशंकर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे १० ते १२ मार्च दरम्यान संचारबंदी असल्याने महाशिवरात्र यात्रा रद्द करण्यात आली आहे. दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीत अत्यंत उत्साही वातावरणात रात्री बारापासून गर्दी होते. यंदा मात्र सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. 

भीमाशंकर येथे गुरुवारी मध्यरात्री बारा वाजता जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि त्यांच्या ;पत्नी यांच्या हस्ते महादेवाची शासकीय पूजा करण्यात आली.  यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.सुरेश कौदरे, उपाध्यक्ष ॲड.विकास ढगे पाटील, भोसरीचे आमदार महेश लांडगे, प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लांभाते, देवस्थानचे विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडिलकर, संजय गवांदे, आदेश कोडिलकर, पुरूषोत्तम गवांदे, आशिष कोडिलकर आदी उपस्थित होते. मंदिरात उपस्थितांच्या समवेत वेदपठणही करण्यात आले. 

दरवर्षी शासकीय पूजेनंतर खऱ्या अर्थाने महाशिवरात्रीची यात्रा सुरू होते. मात्र, यंदा पूजेनंतर मंदिर बंद करण्यात आले. महाशिवरात्रीच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या पहाटेच्या दर्शनास मध्यरात्री बारा वाजल्यापासून रांग लागते. तसेच दरवर्षी फुले, फळे, प्रसाद, पेढा व इतर खाद्य पदार्थांंनी भरलेली दुकाने बहरलेली असतात. 

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक वेगळेच चित्र दिसून आले. दर्शनरांगेत शुकशुकाट होता. मंचर ते भीमाशंकर व खेड ते भीमाशंकर दरम्यान ठिकठिकाणी चेकनाके लावण्यात आले होते. तसेच भीमाशंकर कडे जाणाऱ्या गाडया अडवून परत पाठवल्या जात होत्या. प्रशासनाने यापूर्वीच भीमाशंकर यात्रा होणार नसल्याचे जाहीर केल्याने रस्त्याने वाहनांची गर्दी फारसी दिसत नव्हती.

टॅग्स :BhimashankarभीमाशंकरMahashivratriमहाशिवरात्रीcollectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्याDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील