अलंकापुरीत हनुमान जयंती साधेपणाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:10 IST2021-04-28T04:10:34+5:302021-04-28T04:10:34+5:30

कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद आहे. मात्र, परंपरेनुसार सण, उत्सव, विविध देव-देवतांच्या जन्मोत्सवानिमित्त ...

Hanuman Jayanti in Alankapur simply | अलंकापुरीत हनुमान जयंती साधेपणाने

अलंकापुरीत हनुमान जयंती साधेपणाने

कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद आहे. मात्र, परंपरेनुसार सण, उत्सव, विविध देव-देवतांच्या जन्मोत्सवानिमित्त आळंदी देवस्थानच्या वतीने समाधी मंदिरात फुलमाळांची सजावट करण्यात येत आहे.

तत्पूर्वी, आज पहाटे माउलींच्या समाधीवर पवमान पूजा व दुधारती करण्यात आली. त्यानंतर हनुमान जन्मोत्सवाचे पठण करण्यात आले. माउलींच्या मंदिरात फुलमाळांनी सजावट करण्यात आली. सूर्योदय होताच प्रथा व परंपरेचे पालन करत ‘बजरंग बली की जय’ अशा जयघोषात जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

तर ग्रामदैवत हजेरी मारुती मंदिराला आंब्याच्या पानांचे तोरण व पुष्पहार माळा लावण्यात आल्या. या वेळी आकर्षक विद्युत रोषणाई व दरवर्षाप्रमाणे मोठी सजावट करण्यात आली. मात्र, साध्या पद्धतीने मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शनि मारुती, कुर्‍हाडे तालीम, घुंडरे तालीम, गोपाळपुरा आदी ठिकाणच्या मंदिरातही साध्या पद्धतीने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

तीर्थक्षेत्र आळंदीत हनुमान जयंतीनिमित्ताने माउली मंदिरात फुलांमध्ये हनुमानाची प्रतिकृती रेखाटण्यात आली. (छाया : भानुदास पऱ्हाड)

Web Title: Hanuman Jayanti in Alankapur simply