अनधिकृत बांधकामावर हातोडा

By Admin | Updated: November 17, 2016 03:28 IST2016-11-17T03:28:42+5:302016-11-17T03:28:42+5:30

अनधिकृत बांधकामावर कारवाई करून एकूण ५९५६ चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.

Hammer on unauthorized construction | अनधिकृत बांधकामावर हातोडा

अनधिकृत बांधकामावर हातोडा

रहाटणी : पालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकामविरोधी विभागाच्या वतीने ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ५० थेरगाव, तसेच प्रभाग क्रमांक ५३ वाकड येथील नवीन सुरू असलेल्या आरसीसी व तसेच पत्राशेड अशा १० अनधिकृत बांधकामावर कारवाई करून एकूण ५९५६ चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
थेरगाव व वाकड येथील निवासी भागातील सहा ठिकाणी सुरू असलेल्या अनधिकृत आरसीसी बांधकामावर कारवाई करीत ४५७३ चौरस फुटांचे बांधकाम पाडण्यात आले. तसेच चार ठिकाणच्या पत्राशेडवर कारवाई करून ९८३ चौरस फुटांची पत्राशेड पाडण्यात आली. असे एकूण ५९५६ चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
ही कारवाई कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता आबासाहेब ढवळे, तसेच कनिष्ठ अभियंता, बीट निरीक्षक यांच्या पथकाने केली. जेसीबी, ट्रक, ब्रेकर, पालिकेचे २० अधिकारी, १० मजूर, पालिकेचे १३ पोलीस कर्मचारी यांच्या साह्याने ही कारवाई झाली. (वार्ताहर)

Web Title: Hammer on unauthorized construction