अतिक्रमणांवर मदनवाडी चौफुला येथे हातोडा
By Admin | Updated: March 27, 2017 02:28 IST2017-03-27T02:28:46+5:302017-03-27T02:28:46+5:30
येथील बसस्थानक व मदनवाडी चौफुला उड्डाणपुलाखाली झालेल्या अतिक्रमणांवर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने

अतिक्रमणांवर मदनवाडी चौफुला येथे हातोडा
भिगवण : येथील बसस्थानक व मदनवाडी चौफुला उड्डाणपुलाखाली झालेल्या अतिक्रमणांवर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने कारवाई केली. या दोन्ही उड्डाणपुलाखाली टपऱ्या उभारल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर ही कारवाई केली.
प्रशासनाने गुरुवारी (दि. २३) कारवाई सुरु केली. गुरुवारी (दि.२३) भिगवण बसस्थानकासमोरील, तर शुक्रवारी (दि. २४) चौफुला येथील अतिक्रमणे हटविली.
दर वर्षी राष्ट्रीय महामार्गाच्या जागेमधील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येते. त्यानुसार वरिष्ठांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. उड्डाणपुलाखालील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. अतिक्रमण काढण्यासाठी ७ मार्च रोजी संबंधितांस सूचना देण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे.
- सुनील पानारी, प्रमुख कार्यवाहक, पुणे-सोलापूर एक्स्प्रेस-वे