शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीला निम्म्या विद्यार्थ्यांचे प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 19:12 IST

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दोन नियमित फेऱ्या पुर्ण झाल्या आहेत.

ठळक मुद्देपहिल्या फेरीत २६ हजार ५२० तर दुसऱ्या फेरीत ९ हजार १३६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित दुसऱ्या फेरीची प्रक्रिया पुर्ण झाल्याने आता तिसरी नियमित फेरी दि. २७ जुलैपासून सुरू होणार

पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत अर्ज केलेल्या एकुण ६३ हजार ५६६ विद्यार्थ्यांपैकी ३५ हजार ६५६ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीअखेर प्रवेश निश्चित केले आहेत. दरम्यान, आज (दि. २७) पासून तिसऱ्या प्रवेश फेरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर दि.१ ऑगस्ट रोजी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दोन नियमित फेऱ्या पुर्ण झाल्या आहेत. या प्रक्रियेत पहिल्या फेरीत २६ हजार ५२० तर दुसऱ्या फेरीत ९ हजार १३६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. यानंतर आता केवळ एकच नियमित फेरी होणार असून त्यानंतर प्रथम प्राधान्याने येणाऱ्या या फेऱ्या सुरू होणार आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये एकुण ३२ हजार ९७ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यापैकी २० हजार ६०१ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. तर त्यापैकी ११ हजार ४०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत. एकुण ३६ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला असून २९ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत. दुसऱ्या फेरीची प्रक्रिया पुर्ण झाल्याने आता तिसरी नियमित फेरी दि. २७ जुलैपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग १ व २ भरण्यासाठी दि. २९ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दुसऱ्या फेरीमध्ये पहिला पसंती क्रम मिळूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी होता येणार नाही. तसेच पसंतीक्रम २ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्यास किंवा रद्द केला असल्यास त्यांनाही तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती केंद्रीय प्रवेश समितीचे सचिव प्रविण आहिरे यांनी दिली.---------तिसऱ्या फेरीचे प्रवेश- दि. २७ ते २९ जुलै - भाग १ व भाग २ भरणे- दि. १ ऑगस्ट (सायं. ६) - तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे------- दुसऱ्या फेरीअखेर प्रवेशप्रवेश क्षमता - १,०४०००एकुण अर्ज - ६३,५६६प्रवेश निश्चित - ३५,६५६

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय