शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पानटपरी, हेअर सलून राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 13:46 IST

कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन

ठळक मुद्देपुणे पान व्यापारी महासंघ व नाभिक संघटनांचा निर्णय 

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुणे व्यापारी महासंघाच्या तीन दिवस व्यापार बंदमध्ये पुणे पान व्यापारी महासंघासह व नाभिक संघटनांनी देखील सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे दि. १८ ते २० मार्च असे तीन दिवस पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व पानाची दुकाने व हेअर सलून बंद ठेवण्यात येणार आहे. ‘थुंकीचे पाट आता बास’ या ‘लोकमत’ने सुरू केलेल्या मोहिमेमध्ये असोसिएशनने उत्स्फूूर्तपणे सहभाग घेतला आहे. त्यानुसार पान दुकानाच्या परिसरात स्वच्छता ठेवण्याबरोबरच ग्राहकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त अनेक विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानावर लावले आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन ते करत आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून त्यांनी पुढील तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे व्यापारी महासंघानेही ३ दिवस व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  महासंघाच्या पदाधिकाºयांनी स्वत: लोकमत कार्यालयात येऊन ही माहिती दिली. यापार्श्वभूमीवर संघटनेनेही सामाजिक भान जपत नुकसानीचा विचार न करता यामध्ये सहभाग घेतला आहे. तसेच पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने होत असलेली वाढ लक्षात घेता पुण्यातील नाभिक संघटनांनी देखील पुढील काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या  काळजीच्या दृष्टीने हा निर्णय घेत असल्याचे नाभिक महासंघटनांनी जाहीर केले आहे. .........संघटनेचे अध्यक्ष शरद मोरे, कार्याध्यक्ष राजाभाऊ परदेशी, खजिनदार प्रवीण तकते, पप्पू सिंग, उपाध्यक्ष कमलेश सिंग, सदस्य झुबेर तांबोळी, सुनील खडके, भोजा पुजारी आदींच्या उपस्थित झालेल्या बैठकीमध्ये बंदचा निर्णय घेण्यात आला. पुणे व्यापारी महासंघाने बंदचा कालावधी वाढविल्यास पानविक्रेतेही दुकाने बंद ठेवतील. कोणत्याही विक्रेत्यावर त्यासाठी जबरदस्ती केली जाणार नाही. त्यांनी स्वच्छेने दुकाने बंद ठेवून यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन मोरे यांनी केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड