हगणदरीमुक्त जिल्हा यंदा तरी अशक्यच
By Admin | Updated: March 3, 2015 22:56 IST2015-03-03T22:56:06+5:302015-03-03T22:56:06+5:30
जानेवारीअखेरपर्यंत सुमारे १ लाख १९ हजार ४३९ कुटुंबांकडे अद्याप शौचालये नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ‘हगणदरीमुक्त जिल्हा’ मोहीम यावर्षी तरी कागदावरच राहणार आहे.

हगणदरीमुक्त जिल्हा यंदा तरी अशक्यच
बापू बैलकर ल्ल पुणे
निर्मलग्राम मोहिमेंतर्गत जिल्हा परिषदेने ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील उर्वरित गावे हगणदरीमुक्त करण्याचा ध्यास घेतला असला, तरी जानेवारीअखेरपर्यंत सुमारे १ लाख १९ हजार ४३९ कुटुंबांकडे अद्याप शौचालये नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ‘हगणदरीमुक्त जिल्हा’ मोहीम यावर्षी तरी कागदावरच राहणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीत ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामस्थ आदींनी मार्च २०१५ अखेर तालुके निर्मलग्राम करण्याची शपथ घेतली होती. उर्वरित १ लाख ३६ हजार ७२८ कुटुंबांना शौचालये बांधून देऊन जिल्हा १00 टक्के हगणदरीमुक्त करण्याचा मानस आहे. यासाठी प्रत्येक तालुक्याला एक पालक अधिकारीही नेमला. मात्र जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला असता, हे उद्दिष्ट पूर्ण करणे अवघड असल्याचे चित्र आहे. यातील अडचणी वरिष्ठ पातळीवर सोडविल्या जाणे आवश्यक असताना, त्याकडे डोळेझाक करून फक्त उद्दिष्ट पूर्ण करण्याचा तगादा लावला जात असल्याचे तालुकास्तरावरून सांगितले जात आहे.
१,३६,७२८ कुटुंबांपैकी जानेवारीअखेर १७,२८९ कुटुंबांनी शौचालये बांधली. अद्याप १ लाख १९ हजार ४३९ कुटुंबांकडे शौचालये नाहीत. हा अनुशेष मोठा आहे. पंचायत समिती, सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी यांच्यावर असलेली ही जबाबदारी ते मार्चअखेर किती पार पडतात याकडे लक्ष लागले आहे.
४शासनाने दिलेले उद्दिष्ट मात्र सुमारे ८0 टक्के पूर्ण झाले आहे. अजून एक महिना असून, उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राहुल साकोरे यांनी व्यक्त केला. शासनाने २४,७८५ शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी १७,२८९ शौचालये बांधली आहेत. २२८ गावे निर्मलग्राम पुरस्कार करावयाची होती, त्यातील ३0 गावे निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त झाली आहेत.
विभक्त कुटुंबांमुळे आकडा वाढला
४भोर तालुक्यात फक्त ३८७ कुटुंबांकडे शौचालये बांधणे बाकी आहे असे पंचायत समितीतून सांगण्यात आले; मात्र जिल्हा परिषदेतून घेतलेल्या आकडेवारीवरून तेथे जानेवारी अखेरपर्यंत २३६५ कुटुंबांकडे शौचालये नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत पालक अधिकारी नितीन माने यांना विचारले असता, निर्मल ग्राम पुरस्कारप्राप्त गावांव्यतिरिक्त गावांतील काम हाती घेतले होते. यातील फक्त ३८७ कुटुंबे शिल्लक आहेत. विभक्त कुटुंबांमुळे हा आकडा जास्त दिसत आहे.
खेडमध्ये १३ हजार ३७५ कामे बाकी
४खेड तालुक्यात ६६४१ कुटुंबांकडे शौचालये नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासन सांगत आहे. मात्र, प्रत्यक्षात तिथे १३ हजार ३७५ शौचालयांची कामे बाकी आहेत. फेबु्रवारीत १६४ कामे पूर्ण झाली आहेत. अजून काही गावांचा अहवाल पंचायत समितीला दाखल झाला नसल्याचे गटविकास अधिकारी अजिंक्य पवार यांनी सांगितले.
जानेवारी २0१५ अखेरपर्यंत जिल्ह्यातील निर्मलग्रामची स्थिती
तालुका कुटुंबे किती बांधली शिल्लक
आंबेगाव ४३६८४ १८९८ ५0७२
बारामती ५४७६४ १00२ ९४४२
भोर ३१८२४ १९२१ २३६५
दौंड ४९0९९ १२१८ १४७२३
जुन्नर ६६७३८ ८१७ ८१९३
खेड ६0७१८ १४३५ ६६४१
मावळ ३९६९२ ८७३ १0३४२
मुळशी २७६५५ २५0९ ४४४
पुरंदर ३४0७२ ११८८ ७६६६
शिरूर ५५५२६ १७0३ १३१६३
वेल्हे १११९९ ४६३ १४८३
एकूण ६३९१६९ १७२८९ ११९४३९