शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आता पोलिस टार्गेट करणार ‘भाईचा बड्डे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 19:33 IST

सामान्य नागरिकांना रात्री अपरात्री त्रासदायक ठरणाऱ्या भाईच्या वाढदिवसांना हडपसर पोलिस टार्गेट करणार आहेत.

हडपसर : सामान्य नागरिकांना रात्री अपरात्री त्रासदायक ठरणाऱ्या भाईच्या वाढदिवसांना हडपसरपोलिस टार्गेट करणार आहेत, त्यामुळे अशा कार्यक्रमांचा  नेहमीच त्रास होत असूनही शांत राहणाºया सर्वसामान्य  माणसाला दिलासा मिळणार आहे.                  रात्री अपरात्री होणारी फटाक्यांची आतिषबाजी, जल्लोष, तलवारीने केक कापणे यामुळे परिसरातील नागरिक हैराण झालेले आहेत.गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या वाढदिवसांचा तर ऊत आलेला आहे. सामान्य नागरिक पोलिसांना माहिती कळविण्यास घाबरत आहेत. हडपसर, कोंढवा, मुंढवा, वानवडी या उपनगरांमध्ये सध्या रात्री अपरात्री वाढदिवस साजरा करण्याचे फॅड वाढतच आहे.अशा वाढदिवसावर चाप लावण्यासाठी हडपसर पोलिसांनी पुढाकार घेतलेला आहे.                    हडपसर पोलिसांनी याबाबत नागरिकांमध्ये व व्यावसायिकांमध्ये प्रबोधन होण्यासाठी ठिकठिकाणी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. दुकानदारांना व व्यावसायिकांना खंडणी मागणारे,रात्री बेरात्री वाढदिवस साजरे करणारे, अथवा भाईगिरी करणाऱ्या  गुंडांवर चापबसविण्यासाठी त्यांची माहिती  परिसरातील नागरिकांना विश्वासात घेऊन हडपसर पोलिसांनी घेतली. सामान्य नागरिक, पोलीस मित्र व तरुण कार्यकर्ते हे पोलिसांसाठी कान व डोळा म्हणून काम करीत असतात. नागरिक व पोलिसांचा असाच समन्वय राहिल्यास कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील. असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यंनी व्यक्त केला.  नागरिकांना विश्वासात घेतल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून सध्या हडपसर पोलिस ठाण्यात सावकारी, खंडणी, वाढदिवस साजरे करणारे तथाकथित भाई यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसHadapsarहडपसरArrestअटक