शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते यांना अटकेपासून दिलासा; पुणे पोलीस रिकाम्या हाताने माघारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 17:52 IST

मुंबईत शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हे दाखल होण्यास सुरूवात झाली

पुणे: मुंबईत शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हे दाखल होण्यास सुरूवात झाली. पुण्यात छत्रपती संभाजी राजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एका व्यक्तीने तक्रार दिली होती. त्यानुसार सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोल्हापूर पोलिसानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांना आता पुणे पोलीस ताब्यात घेणार होते. परंतु न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची अटकपूर्व जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना रिकाम्या हाताने माघारी यावे लागणार आहे. 

सदावर्ते सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात होते. तेथील त्यांची पोलीस कोठडी काल संपली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले गेले. न्यायालयाच्या आदेशाने त्यांची अटकपूर्व जामिनावर सुटका करण्यात आली. पुणे पोलिसांना सदावर्ते यांचा ताबा न घेता माघारी यावे लागणार आहे.  

पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने दिली होती तक्रार 

भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरात राहणारे अमर रामचंद्र पवार (वय ३५ वर्षे) यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दिली होती. अमर पवार हे बांधकाम व्यावसायिक असून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून काम पाहतात. सदावर्ते यांनी ७ ऑक्टोबर २०२० रोजी एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार देण्यात आली होती.

अटकेपासून दिलासा

मराठा आंदोलनावेळी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत मुंबई पोलिसानंतर सातारा पोलिसांनी गुणरत्न सादावर्ते यांचा ताबा घेतला. त्यानंतर साताऱ्यातल्या कोर्टानेही काही दिवस त्यांची कोठडीत रवानगी केली. मात्र तोपर्यंत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. साताऱ्यात थोड्या अडचणी कमी होताच गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. काही दिवस त्यांचा मुक्काम कोठडीत राहिला. आणि कोल्हापुरात थोड्या अडचणी कमी झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा पुणे पोलीस घेणार होते. मात्र त्यांना आता अटकेपासून दिलासा मिळाला आहे.  

टॅग्स :PuneपुणेadvocateवकिलCourtन्यायालयPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर