शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सचिन अंदुरेला अमाेल काळे यानेच पिस्तूल पुरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 15:40 IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल अमोल काळे यानेच पुरवले असल्याची माहिती समाेर अाली अाहे.

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल अमोल काळे यानेच पुरवले असल्याची माहिती समाेर अाली अाहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी काळे याला 14 दिवसांची सीबीआय कोठडी द्यावी अशी मागणी सीबीआय च्या वकिलांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम एस ए सय्यद यांनी काळे याची 14 सप्टेंबर पर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी केली.

     काळे याच्या कोठडीची मागणी करताना ढाकणे यांनी न्यायालयाला सांगितले की, उच्च न्यायालयाने या प्रकरणाबाबत एक आदेश दिला असून न्यायालयात सुनावणी न होता संबंधित केसमधील केस डायरी, न्यायालयानत सादर करण्यात यावी त्यानुसार न्यायालयाने निर्णय दयावा. त्यामुळे सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला नाही. या प्रकरणातील तपास संवेदनशील असून त्यात करण्यात आलेल्या तपासाची माहिती माध्यमांना जाऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचे समजते.          एखाद्या प्रकरणात आरोपीला अटक केली असताना कोठडी दिल्यानंतर त्याकडे दुसऱ्याच प्रकरणाची चौकशी केली जाते. अंदुरे हा बंगळुर पोलिसांच्या कोठडीत असताना त्याच्याकडे दाभोलकर प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. ज्या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे त्याच प्रकरणाचा त्याकडे तपास करावा असा गुजरात उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा निर्वाळा यावेळी ॲडव्होकेट धर्मराज यांनी दिला. चौदा दिवसांची पोलीस कोठडी दिल्यास आरोपीकडे दुसऱ्याच प्रकरणांची चौकशी करण्यात येईल, त्यामुळे त्याला कमीत कमी कोठडी द्यावी, अशी मागणी धर्मराज यांनी केली.

    फाॅरेन्सिक अहवालाचा रिपोर्ट येणार असल्याचे कारण देत पोलिसांनी अनेकदा रिमांडची मागणी केली आहे. यापूर्वी अटक आरोपी सचिन अंदुरे 14 दिवस सीबीआय कोठडीत असताना सीबीआयने काय तपास केला याचा न्यायालयाने पोलीस कोठडी देताना विचार करावा. अशी मागणीही धर्मराज यांनी केली.  

टॅग्स :PuneपुणेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरCBIगुन्हा अन्वेषण विभागMurderखून