इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहनचालकांना गुलाबपुष्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 23:22 IST2018-08-29T23:22:16+5:302018-08-29T23:22:49+5:30
पेट्रोल-डिझेल दरवाढ : राष्ट्रवादी काँग्रेसचे गांधीगिरी स्टाईल आंदोलन

इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहनचालकांना गुलाबपुष्प
बारामती : येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढी विरोधात अनोखे आंदोलन केले. यावेळी पेट्रोेल भरण्यासाठी आलेल्या वाहनचालकांना गुलाबपुष्प देउन स्वागत करण्यात आले. विद्यार्थी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष मिलिंद दरेकर यांच्या नेतृत्वाखाली युवा कार्यकर्त्यांनी पेट्रोलपंपावर जोरदार घोषणा दिल्या.
केंद्र-राज्य सरकारचा निषेध केला आणि पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात सर्वसामान्य ग्राहकांना गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी अध्यक्ष दरेकर म्हणाले, ‘‘दररोज वाढत असलेल्या किमतींनी सर्वसामान्यांना हानी पोहोचत आहे. यापुढे आंदोलन अधिक तीव्रपणे करण्याचा निर्धार युवा कार्यकर्त्यांनी केला. या वेळी तुषार जगताप, अमोल रसाळ, अभिजित चव्हाण, रोहन गायकवाड, प्रणव तावरे, शुभम जगदाळे, अविनाश भोसले, इरफान शेख, हृतिक दडस, मयूर मोहिते, मनोज पवार, दत्तराज माघाडे, सूरज रासकर, सोनू पवार तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.