शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात एटीएसची पुण्यात कारवाई; मोहसीन पुनावालाला अटक ; कालुपूर रेल्वे स्टेशन बॉम्बस्फोट प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 20:02 IST

तब्बल १५ वर्षांनंतर पुनावाला याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पुणे : गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) २००६ मधील अहमदाबाद जिल्ह्यातील कालुपूर रेल्वे स्टेशन बॉम्बस्फोट प्रकरणी पुणे पोलिसांच्या मदतीने मोहसीन पुनावाला याला अटक केली. तब्बल १५ वर्षांनंतर पुनावाला याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

गुजरात एटीएसने बॉम्बस्फोट प्रकरणातील पुण्यात वास्तव्यास असलेल्या एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची मदत मागितली होती. त्यानुसार वानवडी पोलिसांची मदत देण्यात आली असल्याचे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी यांनी सांगितले. २००६ च्या या बॉम्बस्फोट प्रकरणात फरार असलेल्या अब्दुल रज्जाक गाजी याला गुजरात एटीएसने बांगला देशाच्या सीमेवरुन ऑगस्ट २०२० मध्ये अटक केली होती. गाझीने पाकिस्तानची गुप्तहेर एजन्सीला मदत केल्याची एटीएसला माहिती मिळाली होती. यावेळी मोहसीन पुनावाला याच्याविषयीची माहिती समोर आली होती. तेव्हापासून पोलीस मोहसीनच्या मागावर होते. दरम्यान, तो वानवडी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वानवडी पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली. 

गुजरात एटिएसच्या माहितीनुसार, गाजीने लष्कर ए तैयबा (एलईटी)चे सदस्य जुल्फिकार कागजी आणि अबु जुंदाल या दोघांना आश्रय दिला होता. त्याच्यावर फेब्रुवारी २००६ मध्ये कालुपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ च्या मध्यभागी बॉम्ब ठेवल्याचा आरोप आहे. या स्फोटात अनेक जण जखमी झाले होते.

टॅग्स :PuneपुणेArrestअटकGujaratगुजरातPoliceपोलिसBlastस्फोट