शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

GBS Treatment : जीबीएस उपचारावरील आर्थिक मदतीला मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 10:03 IST

- महापालिका आयुक्तांनी या मदतीने एक महिन्याची म्हणजेच ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

- हिरा सरवदेपुणे : मागील महिन्यापासून गुलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांना उपचाराच्या खर्चासाठी महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सिंहगड रस्ता परिसरातील नांदेडगाव, किरकटवाडी, नांदोशी, धायरी, डीएसके विश्व या भागात मागील महिन्यात जीबीएसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले होते. महापालिकेकडून या रुग्णांना शहरी गरीब योजनेंतर्गत २ लाख, तर ज्यांच्याकडे शहरी गरीब योजनेचे कार्ड नाही त्या रुग्णांना १ लाखाची मदत देण्यात येते. ही मदत २६ जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे.मात्र, या साथीला अटकाव घालण्यासाठी पालिकेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांना यश आले आहे. त्यामुळे नवीन बाधित रुग्णांची संख्या बऱ्यापैकी कमी झाली आहे. याशिवाय या आजाराचे रुग्ण वर्षभर सापडत असल्याने सर्वांनाच मदत देणे शक्य नाही, त्यामुळे असल्याने उपचारासाठीची दिली जाणारी आर्थिक मदत १ मार्चपासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.मात्र, या आजाराचा साथीचा समूळ नायनाट झालेला नाही. याबाबत राज्य सरकारच्या आरोग्य विभागाशी तसेच केंद्र सरकारच्या महामारीच्या विभागाने जाहीर केलेले नाही. त्यामुळे महापालिकेने जीबीएसच्या रुग्णांना दिली जाणारी मदत बंद करू नये, अशी मागणी विविध संघटना व माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी या मदतीने एक महिन्याची म्हणजेच ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर जीबीएस बाधितांची संख्या विचारात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.आपल्या खात्याने संपर्क करून त्यांच्याकडून खात्री करून घेतली आहे का? आम्ही घेतलेल्या माहितीनुसार अशा प्रकारच्या कुठल्याही सूचना अथवा आदेश आपण ना राज्य सरकारला विचारले ना राज्य सरकारकडून आपल्याकडे कळवले गेले. त्यामुळे आर्थिक मदत बंद करू नये, असे निवेदनात म्हटले आहे.३८ रुग्णांना ४८ लाखांची मदतमहापालिकेकडून आतापर्यंत बीएस आजाराने बाधित झालेल्या १० रुग्णांना प्रत्येकी २ लाखांची तर मदत देण्यात आली, तर शहरी गरीब योजनेत बसत नसलेल्या २८ रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपयांप्रमाणे २८ लाखांची मदत देण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रwater pollutionजल प्रदूषणMuncipal Corporationनगर पालिकाHealthआरोग्य