शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उधळपट्टीला लगाम लावण्यासाठी आयुक्तांकडून मार्गदर्शक सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 12:01 IST

पुणेकरांच्या कराच्या पैशांची उधळपट्टी न करता आर्थिक शिस्त आणावी असे स्पष्ट आदेश पालिकेच्या सर्व विभागांना दिले आहेत.

पुणे : पुणेकरांच्याकराच्या पैशांची उधळपट्टी न करता आर्थिक शिस्त आणावी असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पालिकेच्या सर्व विभागांना दिले आहेत. निविदांचा कालावधी निश्चित करण्यासोबतच नगरसेवकांकडून आग्रह धरला जात असलेल्या निधी वर्गीकरणासाठी अटी घालणे, आर्थिक वर्षाच्या शेवटी होणाऱ्या खर्चाला लगाम घालणे असे अनेक बदल सुचविण्यात आले आहेत. यासोबच शासकीय आस्थापनांवरील खर्च बंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून निविदा प्रसिद्ध करण्यापुर्वी लेखा शाखेचा अभिप्राय घेणेही आवश्यक करण्यात आले आहे. अंदाजपत्रक तयार करताना निविदा प्रक्रिया शेवटच्या दिवसापर्यंत सुरु राहते. अनेकदा वर्गीकरणाचे प्रस्ताव आणि बिलांचे अंतिमकरण करण्यासाठी विविध विभागांकडून विलंब लागतो. त्यामुळे ताळेबंद योग्यरित्या मांडता येत नाही. प्रशासकीय विभागांना आर्थिक शिस्त लागावी याकरित्या आयुक्तांनी 7 जून रोजी सर्व विभागांना मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. आर्थिक वर्ष सुरु होताना एप्रिल ते जानेवारी आणि शेवटी जानेवारी ते मार्चअखेर वर्गीकरणाचे प्रस्ताव दाखल करु नयेत, तसेच प्रस्ताव दाखल करताना ‘क’ अंदाजपत्रकातून ‘अ’ अंदाजपत्रकामध्ये वर्गीकरण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. वर्गीकरण करतानाच प्रकल्पाचे नाव नमूद करणे आवश्यक असून प्रकल्पाची तरतूद दुसऱ्या प्रकल्पाच्या कामासाठीच वर्ग करावी असेही नमूद करण्यात आले आहे.अंदाजपत्रकामध्ये नमूद केलेल्या प्रकल्पालाच वर्गीकरण उपलब्ध करून द्यावे. अपवादात्मक परिस्थितीत वेगळ्या कामासाठी वर्गीकरण (अगदी आवश्यक असल्यास) आयुक्तांच्या मान्यतेने स्थायी समितीपुढे प्रस्ताव ठेवावा. सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, पोलीस ठाणे अशा शासकीय आस्थापनांवर पालिकेचा निधी खर्च करु नये तसेच वर्गीकरणही करण्यात येऊ नये. आवश्यकताच असल्यास आयुक्तांच्या मान्यतेने पुढील कार्यवाही करता येऊ शकेल असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :Puneपुणेcommissionerआयुक्तSaurabh Raoसौरभ रावPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTaxकर