अकरावी सायन्सला प्रवेश घेणाऱ्यांसाठी शनिवारी मार्गदर्शन
By Admin | Updated: April 25, 2017 04:12 IST2017-04-25T04:12:58+5:302017-04-25T04:12:58+5:30
अकरावी सायन्सला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘लोकमत" आणि ‘सप्तर्षी क्लासेस"तर्फे येत्या शनिवारी (२९ एप्रिल) मार्गदर्शन कार्यशाळा होणार आहे.

अकरावी सायन्सला प्रवेश घेणाऱ्यांसाठी शनिवारी मार्गदर्शन
पुणे : अकरावी सायन्सला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘लोकमत" आणि ‘सप्तर्षी क्लासेस"तर्फे येत्या शनिवारी (२९ एप्रिल) मार्गदर्शन कार्यशाळा होणार आहे. दहावीनंतर महत्त्वाच्या टप्प्यांवर घेतल्या जाणाऱ्या निर्णयावरच विद्यार्थ्यांची पुढील वाटचाल निश्चित होत असते; मात्र नेमकी वाटचाल कशी करावी, याबाबत बहुतेक विद्यार्थ्या$ंसह पालकांच्याही मनात संभ्रम असतो. बारावीनंतर अनेकांना अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असतो, त्यासाठी खएए /ठएएळ/ टऌळ - उएळ या प्रवेशपरीक्षा लागू करण्यात आल्या आहेत. अनेकांना या परीक्षेतील बारकाव्यांविषयी मार्गदर्शन अपेक्षित असते. हीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अकरावी सायन्सला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत करिअर तज्ज्ञ विवेक वेलणकर व सप्तर्षी क्लासेसचे संचालक अमित नवले मार्गदर्शन करणार आहेत. संस्कृती लॉन्स, साई चौक, नवी सांगवी येथे शनिवारी, २९ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता कार्यशाळा होणार आहे. दोन तासांच्या या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. या कार्यशाळेसाठी सप्तर्षी कोचिंग इन्स्टिट्यूट या संस्थेने पुढाकार घेतला असून, सप्तर्षी संस्थेच्या दोन शाखा आहेत. तसेच सीझन ग्रुप सोशल वेल्फेअर ट्रस्ट, सांगवी हे या कार्यक्रमाचे स्थळ प्रायोजक आहेत. (प्रतिनिधी)