हिवरे तर्फे नारायणगाव येथे कृषिकन्येकडून मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST2021-07-14T04:13:51+5:302021-07-14T04:13:51+5:30

श्रमशक्ती कृषी महाविद्यालयातील सर्व विद्यार्धी आणि विद्यार्थिनी हा उपक्रम त्यांच्या निवासस्थानाजवळ शेतकऱ्यांसमवेत राबवत आहे. या कृषी कार्यानुभवसाठी विद्यार्थ्यांना साहेबराव ...

Guidance from Krishikanye at Narayangaon by Hiware | हिवरे तर्फे नारायणगाव येथे कृषिकन्येकडून मार्गदर्शन

हिवरे तर्फे नारायणगाव येथे कृषिकन्येकडून मार्गदर्शन

श्रमशक्ती कृषी महाविद्यालयातील सर्व विद्यार्धी आणि विद्यार्थिनी हा उपक्रम त्यांच्या निवासस्थानाजवळ शेतकऱ्यांसमवेत राबवत आहे. या कृषी कार्यानुभवसाठी विद्यार्थ्यांना साहेबराव नवले, डॉ. अशोक कडलक, डॉ. अरविंद हारदे, प्रा. नीलेश तायडे, प्रा. जयेश धांगडा आणि सर्व कार्यक्रम अधिकारी व विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे. या उपक्रमामध्ये कृषिकन्या कु. खोकराळे सिद्धी संदीप यांनी हिवरे तर्फे नारायणगाव येथील महिला शेतकरी शीला आदिनाथ बारवे यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष शेतातील अनुभवांची देवाण-घेवाण करण्यास सुरुवात केली.

आधुनिक पद्धतीची शेती आणि बदल त्यातील माहिती घेतली. यावेळी गावचे सरपंच सोमेश्वर सोनवणे, उपसरपंच दिगंबर भोर, ग्रामसेविका सुजाता खंडे, हिवरे गावातील प्रगतिशील शेतकरी शीला बारवे,आदिनाथ बारवे,सुरेखा बारवे, शिवदास बारवे, ऋषिकेश बारवे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Guidance from Krishikanye at Narayangaon by Hiware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.