शेतकरी सभेत रासायनिक व जैविक खतांबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:10 IST2021-02-05T05:10:18+5:302021-02-05T05:10:18+5:30
जगातील खतउत्पादक अग्रेसर कंपनी इफको यांच्या वतीने नॅनो टेक्नॉलॉजी (नवीन तंत्रज्ञान) इफको कॉपर व इफको नायट्रोजन या नवीन नॅनो ...

शेतकरी सभेत रासायनिक व जैविक खतांबाबत मार्गदर्शन
जगातील खतउत्पादक अग्रेसर कंपनी इफको यांच्या वतीने नॅनो टेक्नॉलॉजी (नवीन तंत्रज्ञान) इफको कॉपर व इफको नायट्रोजन या नवीन नॅनो टेक्नॉलॉजी खताचे उद्घाटन झाले. या वेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष भगवान वाघ, उपाध्यक्ष रामनाथ बांगर, संघाचे संचालक संजय गोरे, नाथा घेवडे, इफको कंपनीचे धनंजय जामदार आणि पिपळगाव ख. गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सदर सभेस इफकोचे जामदार यानी रासायनिक व जैविक खतांबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने कांदा, बटाटा व ऊस पिकाबाबत आवश्यक असणारी खते, तणनाशके, बुरशीनाशके, कीटकनाशके, औषधे व पाणी व्यवस्थापन यावर चर्चा करण्यात आली. या शेतकरी सभेस पिंपळगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यासाठी बहुसंख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. इफको यांच्या वतीने नॅनो टेक्नॉलॉजी इफको कॉपर व इफको नायट्रोजन या नवीन नॅनो टेक्नॉलॉजीयुक्त खताचे उद्घाटन झाले. खरेदीवर इफकोकडून सुमारे ५० हजार ते १ लाख रुपयांचा शेतकरी अपघाती विमा एक वर्षासाठी मोफत दिला जातो. त्यासाठी खरेदी मालाची संघाची पावती शेतकऱ्याने घेणे गरजेचे आहे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष भगवान वाघ यांनी केले. या वेळी जे ज्येष्ठ नेते बाबूराव दादा बांगर, मथाजी पोखरकर,धोंडिभाऊ बांगर, आत्माराम कुरकुटे, रामदास बांगर, अनिल पोखरकर, दीपक पोखरकर, भाऊसाहेब पोखरकर, विठ्ठल बांगर, महादू पोखरकर, दादाभाऊ पोखरकर, बाबाजी बांगर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वसंतराव राक्षे यांनी केले. संघाचे व्यवस्थापक गणेश हुले यांनी आभार यांनी मानले.