गुढीपाडव्याची पुरणपोळी होणार महाग!

By Admin | Updated: April 6, 2016 01:39 IST2016-04-06T01:39:54+5:302016-04-06T01:39:54+5:30

साखर व गुळाच्या भावाने मागील तीन ते चार वर्षांतील भावाचा उच्चांक गाठला आहे. तपमानाच्या साखरेच्या भावाचा पाराही किरकोळ बाजारात चाळिशीत गेला आहे.

Gudi Padwa will be full-scale! | गुढीपाडव्याची पुरणपोळी होणार महाग!

गुढीपाडव्याची पुरणपोळी होणार महाग!

पुणे : साखर व गुळाच्या भावाने मागील तीन ते चार वर्षांतील भावाचा उच्चांक गाठला आहे. तपमानाच्या साखरेच्या भावाचा पाराही किरकोळ बाजारात चाळिशीत गेला आहे. त्यामुळे ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना उष्णतेच्या लाटेबरोबरच साखर, गुळाच्या भाववाढीच्या झळही सोसाव्या लागत आहेत.
राज्यातील नागरिक सध्या उन्हाच्या झळांनी बेजार झाले आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालल्याने तोंडचे पाणी पळाले आहे. साखर व गुळाच्या भाववाढीचा पाराही मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत चालला आहे. या भाववाढीने नागरिकांच्या खिशावरील बोजा वाढला आहे. या वर्षात जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला साखरेच्या भावाने घाऊक बाजारात तिशी गाठली. त्यानंतर हे भाव सातत्याने वाढू लागले आहेत. मंगळवारी घाऊक बाजारात साखरेचे भाव क्विंटलमागे ३५५० ते ३६०० रुपयांपर्यंत पोहचले. तर किरकोळ बाजारात प्रति किलो ३८ ते ४० रुपयांपर्यंत साखरेची विक्री होत आहे. मागील वर्षी याच कालावधीत साखरेचे घाऊक बाजारातील भाव प्रति क्ंिवटल २५०० रुपयांच्या घरात होते. जानेवारी २०१४ मध्येही हे भाव साधारण तेवढेच होते. यंदा तुलनेने प्रति किलो जवळपास दहा रुपयांनी साखर महागली आहे. तीन ते चार वर्षांपुर्वी साखरेचे भाव ४० रुपयांपर्यंत वाढले होते. त्यानंतर यंदा पुन्हा अशीच भाववाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव प्रति क्विंटल ४६५ डॉलरवरून ४३५ डॉलरपर्यंत खाली आले आहेत. तरीही स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या भावातही वाढ सातत्याने सुरू आहे. अनेक साखर कारखान्यांनी सध्या बाजारात मोजकीच साखर आणण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहे. तसेच कारखान्यांकडून जादा भावाने साखर विक्री केली जात आहे. त्यामुळे बाजारात वाढीव भावाने साखर खरेदी करावी लागत आहे.
> मागील काही वर्षांपासून राज्यातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मजुर मिळत नसल्याने गुऱ्हाळे बंद होत आहेत. सध्या कऱ्हाड, कोल्हापूर, पाटण या भागातील गुऱ्हाळे बंद झाली आहेत. केडगाव, पाटण, राहू, पिंपळगाव या भागातून गुळाची आवक होत आहे. गुढीपाडव्यामुळे गुळाची मागणी वाढली आहे. पण गुळाचा तुटवडा जाणवत असल्याने सातत्याने भाववाढ होत असल्याची माहिती गुळाचे व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी दिली.
> साखरेचे भाव गुळ
११ जानेवारी २०१४ २७५०-२८०० २२७५-२७२५
१२ जुलै २०१४३०५०-३१००२८००-३२००
१३ डिसेंबर २०१४२६५०-२६७५२१२५-२६००
१० जानेवारी २०१५२६२५-२६५०२२२५-२७००
११ जुलै २०१५२१००-२१५०२१५०-२५५०
१२ डिसेंबर २०१५२७००-२७५०२२००-२६००
२ जानेवारी २०१६३०७५-३१००२३२५-२७००
१३ फेब्रुवारी २०१६३१७५-३२००२४५०-२७००
५ मार्च २०१६३२००-३२२५२४००-२७२५
५ एप्रिल २०१६३५५०-३६००३१००-३५२५

Web Title: Gudi Padwa will be full-scale!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.