शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

गुऱ्हाळाचे प्रदूषण; गुलछडीचे पीक जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:22 IST

कासुर्डी (ता. दौंड) येथील शेतकऱ्याचे ऐन जोमात आलेले गुलछडीचे पीक गुºहाळाच्या प्रदूषित धुरामुळे जळून गेले आहे

यवत : कासुर्डी (ता. दौंड) येथील शेतकऱ्याचे ऐन जोमात आलेले गुलछडीचे पीक गुºहाळाच्या प्रदूषित धुरामुळे जळून गेले आहे. यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सद्य:परिस्थितीत पावसाळा असल्याने गुºहाळचालक भट्टीत सर्रास पाचटाबरोबर रबर, प्लॅस्टिक व इतर कचरा जाळत आहेत. यामुळे पर्यावरणाचीदेखील मोठी हानी होत आहे.

कासुर्डी येथील जावजीबुवाची वाडी महसूल गाव अंतर्गत गट नं. २०७ मध्ये बाळासाहेब लक्ष्मणराव आखाडे यांची शेती आहे. त्यांनी शेतात गुलछडीचे पीक घेतले होते. ऐन गणेशउत्सव व सणासुदीच्या काळात गुलछडीच्या फुलांना चांगला बाजार मिळत असतो. यामुळे या भागातील शेतकरी मोठे कष्ट करून, या दिवसांमध्ये जोमदार पीक आणतात. बाळासाहेब आखाडे यांनी देखील मोठ्या कष्टाने गुलछडीचे पीक वाढविले होते. त्यांच्या शेतीच्या बाजूला मागील काही वर्षांपासून गुळाचे गुºहाळ सुरू झाले आहे. मात्र, गुºहाळच्या भट्टीसाठी पाचट वापरून सदर धूर योग्य उंचीवर सोडल्यास याचा त्रास कमी असतो. यंदा बाजूच्या गुºहाळचालकाने पाऊस सुरू झाल्यानंतर, पाचटाबरोबर रबर, प्लास्टिक आदी घातक कचरा जाळल्याने दोनच दिवसांत गुलछडीचे पीक अक्षरश: जळून गेले. काही कळण्याच्या आतच वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले.

याबाबत, त्यांनी लोकमत प्रतिनिधीशी संपर्क साधून माहिती दिली. सदरबाबत ते तहसीलदार दौंड यांच्याकडे तक्रार अर्ज करणार असून पिकाचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच, याबाबत प्रशासकीय पातळीवर तातडीने कारवाई न झाल्यास कुटुंबासह उपोषण करणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली.पर्यावरणासाठीदेखील घातक...कोणताही व्यवसाय करायचा झाल्यास प्रदूषण होऊ नये यासाठी व्यावसायिकाला अनेक प्रशासकीय मंजुºया व काळजी घ्यावी लागते. मात्र, दौंड तालुक्यात शेकडो गुळाची गुºहाळे सर्व नियम धाब्यावर बसवून चालविली जात आहेत.गुºहाळच्या भट्ट्यांमध्ये रबर प्लास्टिक आदी घातक गोष्टी जाळल्याने काळ्या धुराचे मोठे लोट आजूबाजूला मोठे प्रदूषण करत असतात. यामुळे आजूबाजूची शेती अडचणीत उलट असून अशा प्रदूषणकारी गुºहाळांवर प्रशासनाने कारवाई करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने