बाथरूममध्ये गुदमरून १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
By Admin | Updated: March 7, 2015 00:07 IST2015-03-07T00:07:14+5:302015-03-07T00:07:14+5:30
मैत्रिणीकडे धुळवड खेळण्याकरिता गेलेल्या १४ वर्षीय मुलीचा अंघोळीला गेल्यानंतर बाथरूममध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची घटना कोथरूडमध्ये शुक्रवारी दुपारी घडली.

बाथरूममध्ये गुदमरून १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
पुणे : मैत्रिणीकडे धुळवड खेळण्याकरिता गेलेल्या १४ वर्षीय मुलीचा अंघोळीला गेल्यानंतर बाथरूममध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची घटना कोथरूडमध्ये शुक्रवारी दुपारी घडली. गॅस गीझरमुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून गेल्या दोन महिन्यांतील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे.
ॠतुजा चंद्रशेखर पवार (वय १४, रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती आणि तिचे आई-वडील सुरुवातीला कोथरूडमधील कुंबरे पार्कमध्ये राहत होते. त्यानंतर ते सिंहगड रस्त्यावरील आनंदनगरमध्ये राहण्यास गेले.
दस्तुर हायस्कूलमध्ये नववीमध्ये शिकत असलेली ॠतुजा शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कुंबरे पार्कमध्ये मैत्रिणीकडे रंग खेळायला आली होती. मित्रमैत्रिणींसह रंग
खेळून झाल्यावर वैष्णवी
भालेराव यांच्या घरी ती अंघोळीला गेली. भालेराव यांची मुलगी
तिची मैत्रीण आहे. धुळवड खेळल्यानंतर अंघोळीला गेल्यावर हा प्रकार घडला. (प्रतिनिधी)
४बाथरूममधील गॅस गीझर सुरूच होता. बराच वेळ ती बाथरूमबाहेर आली नाही, तसेच तिचा आवाजही येत नाही म्हटल्यावर सर्वांनी बाथरूमचे दार वाजवायला सुरुवात केली. बराच वेळ आवाज देऊनही प्रतिसाद मिळेनासा झाल्यावर त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून घेतले. दार तोडल्यानंतर बाथरूममध्ये ॠतुजा बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. त्या वेळी गीझर सुरूच होता, तसेच पाणीही खूप मोठ्या प्रमाणावर गरम झालेले होते. ॠतुजाला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु डॉक्टरांनी तिला उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. ॠतुजाचे वडील भारत फोर्जमध्ये अभियंता आहेत. तिला एक मोठी बहीणही आहे. ॠतुजाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.