गवार, भेंडीच्या भावात वाढ
By Admin | Updated: August 10, 2015 02:39 IST2015-08-10T02:39:37+5:302015-08-10T02:39:37+5:30
घाऊक बाजारात गवार, हिरवी मिरची, भेंडी, दुधी भोपळा, चवळी, कारली, पडवळ या फळभाज्यांचे भाव वाढले. तर शेवगा, मटार, काकडी, टोमॅटो या भाज्यांच्या भावात घट झाली

गवार, भेंडीच्या भावात वाढ
पुणे : घाऊक बाजारात गवार, हिरवी मिरची, भेंडी, दुधी भोपळा, चवळी, कारली, पडवळ या फळभाज्यांचे भाव वाढले. तर शेवगा, मटार, काकडी, टोमॅटो या भाज्यांच्या भावात घट झाली. पालेभाज्यांची आवक माफक होत असल्याने भाव स्थिर राहिले.
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी १७० ते १८० ट्रक शेतमालाची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत भाज्यांची आवक काहीप्रमाणात वाढली. आवक वाढली असली तरी काही भाज्यांचे भाव तेजीत राहिले. आषाढ महिना सुरू असला तरी ग्राहकांकडून काही भाज्यांना पुरेशी मागणी होती. त्यामुळे भाववाढ झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत प्रति दहा किलोमागे भेंडी, हिरवी मिरची, दुधी भोपळा व गवारच्या भावात ८० ते १०० रुपये वाढ झाली. चवळी, कारली व पडवळचे भाव ५० ते ६० रुपयांनी वाढले. तर घेवड्याच्या भावात १०० रुपयांनी आणि शेवग्याच्या भावात १५० रुपयांनी घट झाली. मागणी कमी झाल्याने काकडीचे भावही ८० रुपयांनी उतरले आहेत. इतर फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले. मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक माफक होत असल्याने भाव स्थिर राहिले.
परराज्यांतून घाऊक बाजारात कर्नाटकातून ५ ते ६ टेम्पो मटार व ५ ते ६ टेम्पो कोबीची आवक झाली. तमिळनाडू येथून ७ ते ८ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश व तमिळनाडूतून ७ ते ८ टेम्पो शेवगा, कर्नाटक व मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरचीची आवक झाली. तसेच मध्य प्रदेशातून सुमारे साडेतीन हजार गोणी लसूण आणि इंदूर व आग्रा येथून सुमारे ६० ट्रक बटाट्याची आवक झाली.
स्थानिक भागातून ६०० ते ६५० गोणी सातारी आले, ६ ते ७ हजार पेटी टोमॅटो, १४ ते १५ टेम्पो कोबी व फ्लॉवर, १४ ते १५ टेम्पो सिमला मिरची, १७० ते २०० गोणी भुईमूग शेंग व २० ते २५ ट्रक कांद्याची आवक झाली.
फळभाज्यांचे १० किलोचे दर :
कांदा : ३५०-४२०, बटाटा ६०-१००, लसूण : ४००-९००, आले : सातारी : ३२०-३५०, बंगळुरू २००-२५०, भेंडी : २५०-३००, गवार : गावरान व सुरती ३००-३५०, टोमॅटो : ५०-७०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : १००-१६०, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी : २५०-३००, पांढरी : २००-२२०, पापडी : १८०-२००, पडवळ : २००-२४०, फ्लॉवर : १४०-१८०, कोबी : ८०-१२०, वांगी : १००-१५०, डिंगरी : १८०-२००, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : १६०-२००, तोंडली : कळी : २४०-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : २८०-३५०, गाजर : १४०-१८०, वालवर : २४०-२५०, बीट : ८०-१००, घेवडा : २५०-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : २००-२२०, भुईमूग शेंग ४००-४५०, मटार : स्थानिक ५००, परराज्य ४५०, पावटा : २००-२५०, तांबडा भोपळा : ६०-८०, सुरण २४०-२५०, नारळ : १०००-१२००, मका कणीस (शेकडा) : २००-३००.
पालेभाज्यांचे शेकड्यातील दर : कोथिंबीर ४००-८००, मेथी ४००-८००, शेपू २००-४००, कांदापात ५००-८००, चाकवत ३००-४००, करडई ४००-५००, पुदिना २००-४००, अंबाडी ४००-५००, मुळे ५००-८००, राजगिरा ४००-५००, चुका ३००-४००, चवळई ४००-५००, पालक ३००-५००. (प्रतिनिधी)